News Flash

हिमोग्लोबिन कमी आहे? मग आहारात करा चवळीचा समावेश

जाणून घ्या, चवळी खाण्याचे फायदे

ठराविक भाज्या खाण्याचा कंटाळा आला की गृहिणी अशा वेळी एखादी कडधान्याची उसळ किंवा त्यापासून तयार केलेला चटपटीत पदार्थ मुलांच्या पानात वाढतात. विशेष म्हणजे अनेक लहान मुलांना कडधान्य आवडतात. मात्र, यामध्येदेखील मटकी, मूग, वटाणे ही कडधान्य अधिक खाल्ली जातात. त्याच्या तुलनेत चवळी फारशी खाल्ली जात नाही. परंतु, चवळी खाण्याचे अनेक फायदे असून ती शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं सांगण्यात येत. त्यामुळे चवळी खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

चवळी खाण्याचे फायदे

१.बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दूर होतो.

२. शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा मिळते.

३. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

४. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते.

५. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

६. घसा सुजल्यास चवळीची पानं पाण्यात टाकून ते उकळवावी. त्यानंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात.

७. कॅल्शिअम वाढते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 6:41 pm

Web Title: benefits of eating cowpeas ssj 93
Next Stories
1 Moto G 5G : भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन झाला लाँच, किंमत OnePlus Nord पेक्षाही कमी
2 5000mAh बॅटरीचा शाओमीचा ‘स्वस्त’ स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवी किंमत
3 Airtel फ्रीमध्ये देतंय 5GB डेटा, फक्त डाउनलोड करावं लागेल ‘हे’ App !
Just Now!
X