पास्ता ! नुसत्या नावाने डोळ्यासमोर वाफाळलेली मस्त डिश येते. गरमागरम पास्ता आणि त्याबरोबर हवा असलेला साॅस आणि भाज्या किंवा चिकनचे पीसेस, हवा तर तिखट, हवा तर गोडसर असा आपल्याला पाहिजे तस्सा पास्ता तयार करता येतो. वाॅव!
आपल्याकडे अलीकडेच रूळत जाणाऱ्या पास्ताकडे एक वेस्टर्न पदार्थ म्हणून नाकं मुरडली जातात. हा प्रकार आहे युरोपमधलाच. आपल्याकडे हा प्रकार मुख्यत: बाजारीकरणातून आलेला असल्यामुळे त्याच्या पौष्टिकपणाबाबत रास्त शंका घेतल्या जातात. पण युरोपात विशेषत: इटलीमध्ये आपल्यापेक्षा आणखी चांगल्या पध्दतीने वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता केला जातो. आता आपल्याकडेही चांगल्या दर्जाचे साहित्य आताउपलब्ध होत असल्याने हेल्दी पास्ताही तयार करता येतो आणि पास्ताचे अनेक फायदे मिळवता येतात.

फायबर
पास्ता कशापासून बनलेला आहे यावरही त्यामधली पौष्टिक तत्वं अवलंबून असतात. जर आपल्या प्रकृतीची काळजी घेत पास्ता चा आस्वाद घ्यायचा असेल, तर गव्हाचा किंवा मल्टिग्रेन पास्ता वापरू शकता. मैद्याने बनवलेला पास्ता शक्यतो टाळावा. आजकाल हाॅटेल्समध्येही तुम्हाला हवा असेल तर अशा पध्दतीने पास्ता बनवून मिळतो

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

डायबिटिसशी मुकाबला
आॅलिव्ह आॅईलमध्ये शिजवलेला पास्ता शरीरासाठी अनेक बाबतीत फायदेशीर ठरतो. पण अशा वेळी ‘होल ग्रेन’ पास्ता वापरावा. यावेळी पास्तामध्ये भाज्यांचा वापर केलेला असेल तर शरीराला अँटी आॅक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो. डाय़बेटिक लोकांसाठीही हे फायदेशीर ठरतं.

कॅन्सरपासून संरक्षण
पास्ता बऱ्याचदा टोमॅटो साॅसमध्ये बनवला जातो. शिजवलेल्या टोमॅचो साॅसमध्ये ‘लायकोपीन’ नावाचं अँटी आॅक्सिडंट असतं. ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून शरीराचं संरक्षण व्हायला लायकोपीनची मदत होते. वाढत्या वयाचा शरीरावर होणारा परिणाम रोखायलाही लायकोपीन मदतकारक ठरतं.

वाचा- आता भारतातही ‘इग्लू’मध्ये राहण्याची सोय!
थोडक्यात पास्ता म्हणजे आपल्या पोळी-भाजीच्या जेवणासारखाच आहे पण फक्त यात पोळी आणि भाजी एकत्रच शिजवली जाते. शक्यतो रेड साॅसमध्ये तयार केलेला, भाज्या घातलेला, काही प्रमाणात नाॅनव्हेजचा वापर केलेला, चांगल्या तेलात शिजवलेला पास्ता आरोग्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.