News Flash

केशराच्या सेवनामुळे होतील ‘या’ शारीरिक समस्या दूर; जाणून घ्या फायदे

केशराचे ९ गुणकारी फायदे

मसाल्याच्या पदार्थामधील सगळ्यात दुर्मिळ आणि महागडा पदार्थ म्हणजे केशर. लालसर-गुलाबी रंगाचं केशर हे अत्यंत महाग असून त्याला प्रचंड मागणी आहे. कोणत्याही गोड पदार्थाचा रंग, सुवास किंवा चव वाढवायची असल्यास केशराचा आवर्जुन वापर केला जातो. तसंच बिर्याणीसाठीदेखील केशराचा वापर केला जातो. साधारणपणे केशराचा वापर हा खाद्यपदार्थांमध्येच केला जातो असा सर्वसामान्यपणे समज आहे. मात्र, केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. त्यामुळे केशराचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पदार्थाची चव वाढते.

२. स्मरणशक्ती वाढते.

३. दम्याचा त्रास कमी होतो.

४.पोटदुखी, अॅसिडिटी कमी होते.

५. पचनसंस्था सुधारते.

६. शांत झोप लागते.

७. गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर. परंतु, गरोदरपणात केशर खातांना त्याची मात्रा कमी असावी.

८. त्वचेसाठी फायदेशीर

९.चेहऱ्यावरील फोड, मुरुम, पुटकुळ्या दूर होतात.

दरम्यान, लालसर आणि गुलाबी रंगाच्या केशराची निर्मिती स्पेन, इटली, ग्रीस, इराण, चीन आणि भारतात होते. भारतातील जम्मू आणि काश्मिरमधील लोकांसाठी केशर हे उत्पन्नांचे एक प्रमुख साधन आहे. केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 4:33 pm

Web Title: benefits of eating saffron ssj 93
Next Stories
1 स्वस्त झाला Nokia चा पाच कॅमेऱ्यांचा जबरदस्त स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी
2 Xiaomi Mi 10i भारतात झाला लाँच, मिळेल तब्बल 108MP कॅमेरा; जाणून घ्या डिटेल्स
3 फ्लिपकार्टवर सुरू झाला Realme Days Sale, या स्मार्टफोनच्या खरेदीवर होईल 10 हजारांची बचत
Just Now!
X