News Flash

…म्हणून लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

दैनंदिन आहारात समावेश हवा

आहारातील काही पदार्थांमध्ये आपण लसूण खातो. पण दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश असेलच असे नाही. पण लसणामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक उपयुक्त घटक असतात. आहारात ६ रसांचा समावेश असावा असे आपण कायम ऐकतो. विशेष म्हणजे लसणामध्ये आंबटपणा सोडून इतर ५ ही रस असतात. त्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ समजला जातो. आयुर्वेदात परिपूर्ण आहारद्रव्य म्हणूनही लसणाची ओळख आहे. लसणाच्या कंदापासून पानाच्या टोकापर्यंत सर्व घटक शरीरासाठी उपयुक्त असतात. आपल्यातील अनेक जण लसूण बाजारातून खरेदी करतात. पण कुंडीतही लसूण अगदी सहज येऊ शकतो. हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारी यांसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे हे आहेत फायदे…

१. लसूण आणि त्याच्या पातीची चटणी जेवणात चव तर आणतेच पण ती चवीलाही खूप रुचकर लागते. ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही चटणी म्हणजे अतिशय उत्तम उपाय आहे.

२. साधारणपणे हिवाळ्यामध्ये ओला लसूण बाजारात मिळतो. तो कमी तिखट आणि कमी उग्र असतो. त्यामुळे ज्यांना लसूण आणि त्याचा वास आवडत नाही त्यांच्यासाठी हा लसूण म्हणजे उत्तम पर्याय ठरु शकतो.

३. ताप आणि इतर कारणांमुळे ज्यांच्या तोंडाला चव नसते त्यांनी आवर्जून ४ ते ५ दिवस लसणाची फोडणी दिलेले अन्न खावे. त्यामुळे तोंडाची गेलेली चव येण्यास मदत होते.

४. लसूण उष्ण पदार्थ असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी लसूण खाणे टाळावे. एखादवेळी हिवाळ्यात खाणे ठिक आहे पण उन्हाळ्यात लसूण खाणे टाळावे.

५. लसूण बुद्धीवर्धक असून ज्यांना लक्षात ठेवण्यात अडचणी येतात त्यांनी जरुर लसूण खावा. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांनी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास चांगला उपयोग होतो.

६. दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्यांनीही लसूण खावा. याशिवाय सतत आळस, झोप, थकवा वाटत असल्यास ते कमी होण्यासाठीही लसणाचा चांगला उपयोग होतो.

७. ज्यांना कफ आणि दम्याचा त्रास होतो त्यांनी सकाळी उठल्यावर दोन पाकळ्या लसणाबरोबर गरम पाणी प्यावे. हा त्रास कमी होण्यास मदत होते. वैद्यकीय उपचारांबरोबर हा उपाय केल्यास लवकर बरे होण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 11:00 am

Web Title: benefits of garlic for good health
Next Stories
1 या वर्षात ‘iPhone X’ ची विक्री होणार बंद?
2 युवा भान : दोन आठवडय़ांत बारीक व्हायचेय?
3 साखर न घातलेला फळांचा रस हानीकारक नाही
Just Now!
X