14 December 2017

News Flash

‘हे’ आहेत सकाळी व्यायाम करण्याचे फायदे

स्वतःला सवय लावणे गरजेचे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 8, 2017 11:00 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक असतो असे आपण नेहमी ऐकतो. पण प्रत्यक्षात आपल्याला वेळच्यावेळी व्यायाम करायला मिळतो का असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच असते. कधी सकाळी जागच आली नाही म्हणून तर कधी रात्री झोपायला उशीर झाला होता अशी कारणांची यादीच आपल्याकडे तयार असते.

तुम्हाला आलेला विविध गोष्टींचा ताण कमी करण्यामध्ये तसेच तुमची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी सकाळी केलेल्या व्यायामाचा विशेष उपयोग होतो. त्यामुळे सकाळची ठराविक काळ तुम्ही न चुकता व्यायामासाठी दिलात तर तुमचा पूर्ण दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. त्यामुळे थोडा वेळ काढा आणि सकाळचा व्यायाम हा जोपर्यंत तुमची सवय बनत नाही तोपर्यंत तरी थोडे कष्ट घ्यावेच लागतील. काय आहेत सकाळच्या व्यायामाचे फायदे जाणून घेऊया…

१. भूक वाढते – सकाळी उठून व्यायाम केल्याने जोरदार भूक लागते. व्यायाम करुन झाल्यानंतर तुमच्या शरीराला ऊर्जा आणि पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. याशिवाय व्यायामामुळे पचन सुरळीत होण्यासही मदत होते.

२. चयापचय वाढण्यासाठी उपयुक्त – सकाळी केलेला व्यायाम तुमच चयापचय क्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त असतो. ही क्रिया चांगल्या पद्धतीने होत असल्यास अन्न योग्य पद्धतीने पचण्यास मदत होते तसेच शरीरातील वाढलेली चरबी जळण्यास मदत होते.

३. ताण घालविण्यास फायदेशीर – ताण घालविण्यासाठी अनेक उपाय सुचविले जातात. मात्र सकाळी केलेला व्यायाम ताण घालविण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरतो.

४. दिवसभरासाठी मिळते ऊर्जा – व्यायाम केल्यानंतर काही वेळ आपल्याला दमल्यासारखे वाटते. मात्र शरीरातील हॉर्मोन्स काही प्रमाणात वरखाली झाल्याने हा थकवा तेवढ्य़ापुरता जाणवतो. परंतु सकाळच्या व्यायामाने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

५. चांगली झोप येते – व्यायामामुळे शरीरातील स्नायूंना ताण पडतो. त्यामुळे छान झोप लागते. तुम्ही किती वेळ झोपता यापेक्षा जितका वेळ झोपता ती झोप कशी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

६. इतर गोष्टींसाठी जास्त वेळ मिळतो – अनेकदा सकाळी जाग येत नाही म्हणून संध्याकाळी व्यायामाला जाण्याचे नियोजन केले जाते. मात्र संध्याकाळचा व्यायामाचा वेळ वाचल्यास निश्चितच फायद्याचे ठरते. सकाळीच व्यायाम झालेला असल्यास संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्र-मैत्रिणींना वेळ देता येतो.

First Published on August 8, 2017 11:00 am

Web Title: benefits of morning exercises try and experience