प्राणायाम हा उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असतो असे आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचे नेमके शरीराला काय फायदे होतात याबाबत आपल्याला पुरेशी आणि शास्त्रीय माहिती नसते. प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे घेणे. शरीरात ऑक्सिजन घेणे म्हणजे प्राणायाम. श्वास तर आपण दिवसभर घेतच असतो, पण प्राणायामाची शास्त्रीय पद्धत असून हा विशिष्ट पद्धतीने घेतलेला श्वास आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळी विशिष्ट वेळासाठी नियमित प्राणायाम केल्यास त्याचे निश्चितच फायदे होऊ शकतात. पाहूयात काय आहेत प्राणायम करण्याचे फायदे.

१. २० मिनिटे केलेला प्राणायाम १ तास केलेल्या व्यायामाइतका फायद्याचा असतो.

vivek oberoi reveals arranged marriage with priyanka alva
फोटो पाहिला, इटलीला गेला अन्…; ऐश्वर्या राय बरोबर ब्रेकअपनंतर विवेक ओबेरॉयने मंत्र्याच्या लेकीशी केलं लग्न; बायकोला पाहिलंत का?
Ajit Pawar and Sharad Pawar
“शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…”, अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत
योगस्नेह : हस्तपादासन
देशप्रेम म्हणजे काय रे भाऊ?

२. प्राणायामामुळे श्वसनाला एकप्रकारची लय येते आणि त्याचा शरीरासाठी फायदा होतो.

३. प्राणायामामध्ये डावी नाकपुडी (चंद्रनाडी) आणि उजवी नाकपुडी (सूर्यनाडी) यांच्यामार्फत श्वसनक्रिया संतुलित होऊन आयुर्मान वाढते.

४. शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि शरीरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते.

५. एकाग्रता वाढण्यास मदत होते.

६. पचनक्रिया सुधारते, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

७. हॉर्मोन्सच्या कार्यात समतोल राहतो आणि ग्रंथी सक्रीय होतात.

८. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे सर्दी, खोकला आणि अस्थमाचे प्रमाण कमी होते.

९. मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, पॅरालिसिस, वजन कमी/ जास्त करणे यामध्ये प्राणायामाचा फायदा होतो.

१०. नियमीत प्राणायाम करण्याने मन प्रसन्न, उत्साही राहते. मनावर ताबा मिळवता आल्याने कोणत्याही कठिण परिस्थितीत योग्य ते निर्णय घेता येतात.

टीप – प्राणायामाचे अनेक फायदे होत असले तरीही ते शास्त्रशुद्ध पद्धतीने, तज्ज्ञांकडून योग्य ते प्रशिक्षण घेऊन मगच करावे. व्यक्तीनुसार ते कोणी, कधी आणि किती प्रमाणात करायचे हे बदलणारे असते.

मनाली मगर-कदम, फिटनेसतज्ज्ञ