23 October 2020

News Flash

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे हे आहेत फायदे

उन्हाच्या दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन करणे गरजेचे असते. उन्हाळाच्या ऋतूमधील खूप महत्वाचे फळ म्हणजे कलिंगड.

कलिंगडाचे फायदे

नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. चैत्र वैशाख महिन्यामधील ऊन म्हणजे अंगाची नुसती लाही करणारे ऊन. थंडीच्या गार वातावरणातून अलगतपणे ऋतू आपला छटा बदलताना आपल्याला दिसतो. बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला आरोग्याचीही काळजी घेणे गरचे असते. आरोग्याची काळजी आपण घेतली नाही तर या दिवसांमध्ये त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून येतात. उन्हाच्या दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन करणे गरजेचे असते. उन्हाळाच्या ऋतूमधील खूप महत्वाचे फळ म्हणजे कलिंगड. या फळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व तसेच विपुल प्रमाणात पाणी असल्याने त्याचा फायदा आपल्याला शरीराला होतो. कलिंगडामधून विटामिनस ए, बी६ आणि विटामिनस सी खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्याचं प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो असिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते.

कलिंगडाचे आपल्या शरीराला होणारे फायदे :

  • कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्त चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते.
  • शरीरातील कामोत्तेजक वाढण्यास कलिंगड मदत होते.
  • जर तुम्हाला डोळ्यांच्या तक्रारी असतील तर तुम्ही कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर राहील
  • कलिंगडामुळे तुमचा मूड ठीक होण्यास मदत होईल.
  • या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कलिंगडाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरेल.
  • कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते.
  • कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे.
  • उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते.
  • आपल्या शरीरामध्ये असणारे मऊ स्नायूंना कलिंगडामुळे बराच फायदा होत असतो.
  • कलिंगडमुळे अनेकदा लघुशंका होते. पण त्यामुळेच शरीरामध्ये तयार झालेली घाण आपल्याला शरीराबाहेर काढता येते.

 डॉ. अस्मिता सावे – रिजॉईस वेलनेसआहारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 1:31 am

Web Title: benefits of watermelon fruit in summer
Next Stories
1 समजून घ्या! पौगंडावस्थेतील आहाराच्या गरजा
2 सावधान! तुमच्या प्रत्येक घासात आहे प्लॅस्टिक
3 …म्हणून टूथपेस्टवरचा हा कलरमार्क तपासा
Just Now!
X