News Flash

गुणकारी कलिंगड; उन्हाळ्यात ‘या’ त्रासांपासून रहाल लांब

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, बी६ आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात

कलिंगड

नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. चैत्र वैशाख महिन्यामध्ये अंगाची लाही लाही होईपर्यंत कडक उन्ह असतं. त्यामुळे या उन्हात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारात रोज फळे, भाज्या, सरबते यांचा समावेश असला पाहिजे. या दिवसांमध्ये कलिंगड, ताडगोळे अशी अनेक फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ही फळे या दिवसांमध्ये खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.  त्यातच कलिंगड हे फळ म्हणजे उन्हाळ्यात आपल्यासाठी वरदानचं आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, बी६ आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचं प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो असिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते. तसंच कलिंगडाचे इतर बरेच फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात कलिंगड खाण्याचे फायदे. –

कलिंगडाचे आपल्या शरीराला होणारे फायदे :

१.कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्त चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते.

२. शरीरातील कामोत्तेजक वाढण्यास कलिंगडाची मदत होते.

३. जर तुम्हाला डोळ्यांच्या तक्रारी असतील तर कलिंगडाचं सेवन करणं फायदेशीर आहे

४. कलिंगडामुळे तुमचा मूड ठीक होण्यास मदत होईल.

५. या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कलिंगडाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरेल.

६. कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते.

७. कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे.

८. उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते.

९. आपल्या शरीरामध्ये असणारे मऊ स्नायूंना कलिंगडामुळे बराच फायदा होत असतो.

१०. कलिंगडमुळे अनेकदा लघुशंका होते. पण त्यामुळेच शरीरामध्ये तयार झालेली घाण आपल्याला शरीराबाहेर काढता येते.

(आहारतज्ज्ञ अस्मिता सावे – रिजॉईस वेलनेस)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 4:35 pm

Web Title: benefits of watermelon fruit in summer ssj 93
Next Stories
1 मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? या सोप्या गोष्टी करुन पाहाच
2 रेल्वेत नोकरीची संधी; ६०० पदांसाठी निघाली भरती
3 Lockdown : दाढी वाढवत असाल तर ‘या’ गोष्ट लक्षात ठेवा
Just Now!
X