पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा जास्त वापर केला जात होता. खरंतर साखर आणि गुळ दोन्ही उसापासून तयार केले जातात. मात्र, गूळ साखरेच्या तुलनेने आरोग्यास फायदेशीर आहे. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरतम राहिलेलं आहे. या गुळाची जागा साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळाचे फायदे नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
१. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.
२.मासिक पाळीच्यावेळी तीळ आणि गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.
३.पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
४.शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास गूळ खावा.
५. थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खाणे फायदेशीर आहे. मात्र, तो प्रमाणात खावा.
६. गुळामधील ‘ड’ जीवनसत्त्व मधुमेह उपचारावर फायदेशीर
७. गुळामुळे पचनशक्ती सुधारते.
८. चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स असल्यास गूळ खावा.
टीप –
कोणताही पदार्थ प्रमाणात खावा. त्यामुळे गूळदेखील प्रमाणात खावा. गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त दुषित होऊन अंगावर फोडं येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी गूळ खाणे टाळावे.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2020 4:33 pm