07 August 2020

News Flash

पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या गुळाचे गुणकारी फायदे

पचनक्रिया सुधारण्यापासून ते घशाची खवखव थांबविण्यापर्यंत गुळ खाण्याचे असेही फायदे

गुळाचा गोडवा हा काही निराळाच असतो असं आजही अनेक घरांमध्ये आई किंवा आजीकडून ऐकायला मिळत. पूर्वी साखरऐवजी गुळाचाच वापर अधिक होत होता. त्यामुळे कोणत्याही सणावाराच्या दिवशी गुळपोळी, पुरणपोळी असे पदार्थ हमखास व्हायचे. पदार्थाची चव वाढविणाऱ्या गुळाचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. त्यामुळेच पूर्वी बाहेरुन उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गुळपाणी देत होते. चला तर मग जाणून घेऊयात गुळ खाण्याचे फायदे.

१. गुळ -शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.

२. थंडीत गुळ आवर्जुन खावा. परंतु, तो प्रमाणात असावा. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचा त्रास होतो. गुळ उष्ण आहे, त्यामुळे तो जास्त खाऊ नये.

३.अशक्तपणा आल्यानंतर गुळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.

४. शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गुळ करतो

५. पाळी नियमित येत नसेल तर गुळ खाणं फायदेशीर ठरतं.

६. मासिक पाळीच्यावेळी तीळ-गुळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.

७. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.

८. जेवणानंतर गुळाचा खडा खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 4:45 pm

Web Title: benifits of having jaggery in marathi ssj 93
Next Stories
1 मारुतीच्या Brezza ला टक्कर, येतेय Nissan ची नवीन बी-एसयूव्ही ‘मॅग्नाइट’
2 पाठदुखीने त्रस्त आहात? मग जाणून घ्या उपाय
3 मंदीत संधी; CRPF मध्ये निघाली भरती, पगार एक लाख ४२ हजार रुपयांपर्यंत
Just Now!
X