News Flash

आपल्या प्रियजनांना द्या नववर्षाच्या शुभेच्छा !

मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.

मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.

बघता बघता २०१६ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल. हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. याच गोष्टी मनात ठेऊन आपण आपल्या आप्तेष्टांचेही हित चिंतत असतो. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही. त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे.  मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो. काही लोकांची आठवण आपण रोज काढत नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा त्या व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण एकमेकांना विसरलो हे कधी पटतच नाही. अशा सर्व नातेवाईक, मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.

१. सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्ने, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

३. गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

४.पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,  तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवीन संकल्प नवीन वर्ष.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

५. एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला; जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वारे….नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

६. चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया

७. पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने,  फूलांचेही व्हावे गाणे असे जावो नवे वर्ष आनंदाने

८. पाहता दिवस उडून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झाकोळून जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील…. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

९. नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेले सर्व संकल्प, निदान या वर्षी तरी पूर्ण होवोत या खऱ्याखुऱ्या शुभेच्छा..

१०. नव्या या वर्षी आकाशी रंग उधळले नवे, प्रत्येक क्षण साठव मनात होऊ दे त्यांचे थवे

११. येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या दिनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 9:27 pm

Web Title: best new year sms facebook whatsapp messages to send happy new year greetings
Next Stories
1 नववर्षाच्या धमाल पार्टीसाठी काही झक्कास ‘आइडिया’
2 मधुमेहाच्या औषधांमुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट
3 आपल्या आवडत्या व्यक्तींना या नववर्षाला काय भेटवस्तू देणार आहात?
Just Now!
X