02 March 2021

News Flash

फ्री कॉलिंगसाठी Airtel चे बेस्ट प्लॅन्स, डेटाचाही मिळेल फायदा

एअरटेलचे हे प्लॅन्स तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरु शकतात...

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन्स आणत असतात. ऑनलाइन कॉन्टेंट आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्ससाठी आता ग्राहकांना अधिक डेटा देणारे प्लॅन पसंतीस पडतायेत. पण यामध्ये काही असे ग्राहकही आहेत ज्यांना डेटाऐवजी कॉलिंगचे फायदे असणारे प्लॅन्स अधिक आवडतात. अशाच ग्राहकांसाठी एअरटेलने काही खास प्लॅ आणलेत. जर तुम्ही तुमच्या ड्युअल सिम फोनमध्ये एक सिमकार्ड डेटासाठी व एक कॉलिंगसाठी वापरत असाल तर एअरटेलचे हे प्लॅन्स तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरु शकतात. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत…

एअरटेल 179 रुपयांचा प्लॅन :
-या प्लॅनची वैधता 28 दिवस असून या प्लॅनमध्ये 2जीबी डेटा मिळतो.
-या प्लॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ग्राहकांना भारती AXA कडून 2 लाखांचा विमा कवच दिले जाते.
-एकूण 300 फ्री एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग
-ग्राहकांना विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रिम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस

एअरटेल 379 रुपयांचा प्लॅन :
-अधिक कॉलिंग करणाऱ्यांच्या एअरटेलचा हा प्लॅन पसंतीस पडू शकतो.
-84 दिवस वैधता आणि एकूण 6जीबी डेटा ऑफर
-देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ऑफरअंतर्गत FASTag खरेदीवर 150 रुपये कॅशबॅक
-दररोज 100 फ्री एसएमएस आणि विंक म्युझिक व एअरटेल एक्सट्रिम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस

एअरटेल 1,498 रुपयांचा प्लॅन :
-दररोज 100 फ्री एसएमएस आणि 365 दिवस वैधता व एकूण 24जीबी डेटा
-कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग
-FASTag च्या खरेदीवर 150 रुपये कॅशबॅक
-विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रीम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 2:45 pm

Web Title: best plans of airtel mwith calling benefits sas 89
Next Stories
1 त्याने फक्त चार वर्षात १०८ किलो वजन केलं कमी!
2 ‘बजाज चेतक’ला TVS iQube ची टक्कर, पाच हजारांत बुकिंगला सुरूवात
3 भारतीय अन्न महामंडळामध्ये ४१०३ जागांची भरती
Just Now!
X