16 February 2019

News Flash

२० हजारांच्या आत स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत उत्तम पर्याय

उत्तम फिचर्स आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त फोन बाजारात दाखल

तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत असल्याने विविध स्मार्टफोन कंपन्या ठराविक काळाने आपले फोन बाजारात दाखल करत आहेत. स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी या कंपन्या अधिकाधिक सुविधा असणारे फोन बाजारात दाखल करतात. ग्राहकही नव्याने येणाऱ्या या फोनला चांगली पसंती देताना दिसतात. कधी फोन खराब झाला म्हणून, तर कधी भेटवस्तू , तर कधी सहज जुन्या फोनचा कंटाळा आला म्हणून तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात अतिशय चांगले पर्याय उपल्बध आहेत.

Moto G6

मोटोरोला कंपनीचे फोन हे स्वस्तात मस्त फोन म्हणून ओळखले जातात. यावर्षी कंपनीने आपले सहाव्या जनरेशनचे जी सिरीजमधील फोन लाँच केले आहेत. यातील Moto G6 आणि Moto G6 Play हे फोन भारतात १३,९९९ रुपयांना सुरु होत आहेत. या फोनची फिचर्स आणि लूक अतिशय वेगळा आणि आकर्षक आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत भारतात १५,९९९ रुपये आहे.

Huawei P20 Lite

अतिशय स्लीम असलेला या फोनची काच खूप चांगली आहे. iPhone X चा ज्याप्रमाणे नॉच स्टाईल डिस्प्ले देण्यात आला आहे तसाच डिस्प्ले या फोनलाही देण्यात आला आहे. २४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३००० मिलिअॅम्पियर्सची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. याची रॅम, मेमरी आणि इतर फिचर्सही अतिशय आकर्षक असून भारतात हा फोन १९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Oppo F7

Huawei P20 Lite प्रमाणेच या फोनलाही नॉचसारखा डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र या फोनची स्क्रीन थोडी मोठी आहे. हा फोन ग्लॉसी लाल आणि सिल्व्हर रंगात देण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला हा फोन १९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. याचा प्रोसेसर आणि रॅमही उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही ओप्पोचे नवीन मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो.

Redmi Note 5 pro

शिओमी ही मोबाईल कंपनी मागच्या काही काळात चांगलीच फॉर्ममध्ये आहे. कंपनीचे Red mi मोबाईल त्याचे आकर्षक फिचर्स आणि बॅटरीच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचे Redmi Note 4 आणि Redmi Note 5 हे फोन मोठ्या प्रमाणात गाजले. त्यानंतर आता हा Redmi Note 5 pro कंपनीने लाँच केला आहे. या फोनच्या ४ जीबी रॅमच्या मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये तर ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत १६,९९९ रुपयांना आहे.

Oppo Realme 1

ओप्पो कंपनीचा ऑनलाईन सबब्रँड असलेल्या Realme कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. ही कंपनी अवघ्या १३,९९० रुपयांमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीचा फोन खरेदी करता येणार आहे. याचे फिचर्सही अतिशय उत्तम असून नव्याने स्मार्टफोनमध्ये आलेल्या जवळपास सर्व सुविधा कंपनीने या आपल्या पहिल्यावहिल्या फोनमध्ये दिल्या आहेत.

Asus Zenfone Max Pro M1

मागच्या काही काळात असूस कंपनीचे फोन बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. मात्र मधल्या काळात कंपनीच्या मोबाईलचा खप कमी झाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा कंपनी नव्या दमाने उभी राहीली आहे असे आपण म्हणू शकतो. Asus Zenfone Max Pro M1 हा फोन १२,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. याची बॅटरीही अतिशय पॉवरफूल म्हणजे ५००० मिलिअॅम्पियर्सची आहे.

First Published on July 12, 2018 6:21 pm

Web Title: best smartphones to buy under rs 20000 redmi note5 pro moto g6 realme 1 huawei p20 lite