– डॉ. वशिष्ठ मणियार

भारतात कर्करोग वेगाने वाढत असून ती सर्वसाधारण आरोग्य समस्यांमध्ये त्याचा समावेश होत आहे. मात्र, जीवनशैली आणि प्रदुषणासारख्या पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या राक्षसामुळे फुप्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाणाही वाढत आहे. अमेरिकी कॅंन्सर सोसायटीनुसार येणाऱ्या काळात नव्या कर्करोगांमध्ये फुप्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण अंदाजे 14 टक्के असेल व तो भारतातील दुसऱ्या क्रमांकाच सर्वाधिक होणारा कर्करोग आणि आतापर्यंत कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमागचे प्रमुख कारण आहे.

कर्करोगाच्या दरात वेगाने वाढ होत असताना दुसरीकडे उपचार व औषधांमध्येही वेगाने विकास घडून येत आहे. शास्त्रज्ञ या भयंकर आजाराचा सामना करण्यासाठी नव्या तंत्रांचा शोध लावत आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा किमो थेरपीशिवाय नव्या युगात बऱ्याच उपाययोजना आहेत. या नव्या उपाययोजनांचे दुष्परिणाम कमी असतात असा दावा केला जात असून हा मुद्दा कर्करोगाच्या उपचारांत अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

अशाप्रकारची एक उपचारपद्धती म्हणजे इम्युनो- आँकॉलॉजी थेरपी. गेल्या काही वर्षांत या थेरपीचा विकास हा कर्करोगाच्या उपचारांमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र, उपचारांमधील आव्हाने कायम आहेत. अतिरिक्त इम्युन चेकपॉइंट्सवर उपाययोजना काढण्याच्या संभाव्यतेसाठी बायोमार्कर्स इम्युनो आँकोलॉजीमधील संशोधन कर्करोग उपचारांच्या विकासासाठी महत्त्वाचे बनवत आहेत. रोगप्रतिकारक यंत्रणेला ती मजबूत करण्यासाठी चालना देण्याने किंवा आजारग्रस्त पेशींची लढण्याची क्षमता परत निर्णाण करण्यासाठी अतिरिक्त घटक देण्याने इम्युनो- आँकॉलॉजी औषधांची दीर्घकालीन अस्तित्वाची शक्यता बहाल करण्याची संभाव्यता वाढते. त्याचप्रमाणे त्यातून जीवनमानाचा दर्जा पूर्ववत करण्याची – आता आणि भविष्यातही आर्थिक आणि सामाजिक फायदे पुढे आणण्याची शक्यता वाढते. जास्तीत जास्त रूग्णांना दीर्घकाळ अस्तित्वाची भेट देणे हे या उपचारांचे लक्ष्य आहे. इम्युनोथेरपीचे कॉम्बिनेशन कर्करोगाचा सामना करण्यासाठीचे अधिक प्रभावी साधन म्हणून त्याची चाचणी करण्यात आली आहे.

इम्युनो- आँकॉलोजीमधील नाविन्य कर्करोगाच्या रूग्णांना त्यांची स्थिती व पर्यायाने त्यांचे जीवनमान दर्जेदार करण्यासाठी आशा देत असून कर्करोगासह जगणाऱ्या रूग्णांना असामान्य निकष मिळवून देण्यासाठी आरोग्यसेवा पुरवठादारांना संधी देत आहे. सुरुवातीला उपचारांची ही पद्धत फारशी प्रचलित नव्हती, मात्र कर्करोग उपचार क्षेत्रात ती हळूहळू स्वीकारली जात आहे आणि कर्करोगासाठी ती पूर्णपणे वैद्यकीय मान्यताप्राप्त उपचारपद्धती समजली जात आहे.

त्याचप्रमाणे अजून अशा बऱ्याच उपचारपद्धती आणि थेरपीज आहेत, ज्यांना डॉक्टर्स, संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून मान्यता मिळत आहे. आपल्याला माहीत आहे, की कित्येकदा वैज्ञानिक यश अनपेक्षित ठिकाणांपासून मिळत आहेत. त्याचप्रकारे संशोधकांचा दावा आहे, की अशी आणखी एक अशी प्रभावी पद्धत आहे, जी कर्करोग मूळ पेशींच्या विरोधात अँटीबायोटिक्सच्या मदतीने लढा देईल. माइटोकॉन्ड्रिया हे सर्व पेशींचे प्रमुख केंद्र मानले जाते, कारण त्या उर्जेचा स्त्रोत आहेत. हे कर्करोगाच्या ट्युमरमध्ये आढळणाऱ्या उत्परिवर्तन (म्युटेटेट) पेशींच्या बाबतीत खरे आहे, जिथे ते ट्युमरच्या वाढीसाठी मेटाबॉलिक स्त्रोत पुरवतात. अँटीबायोटिक्समुळे उत्परिवर्तन पेशींविरोधात लढण्यास मदत होते आणि ट्युमरच्या वाढीला विरोध केला जातो. कदाचित याचमुळे असे दर्शवण्यात आले आहे, की बॅक्टेरियाशी लढण्यात प्रभावी असलेल्या अँटीबायोटिक्स माइटोकॉन्ड्रियावरही परिणाम करतात.

या संशोधकांनी 8 वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोग ट्युमर पेशींच्या लाइनवर पाच वेगवेगळ्या सध्या प्रीस्क्राइब केल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्सची चाचणी केली. यातून असा निष्कर्ष दिसून आला, की पाचपैकी 4 अँटीबायोटिक्सनी प्रत्येक प्रयोगात कर्करोगाच्या मूळ पेशी नष्ट केल्या व नेहमीच्या पेशींच्या लाइनला (कर्करोगग्रस्त नसलेल्या) त्याचा कोणताही धक्का पोहोचला नाही. अँटीबायोटिक्सनी फुप्फुसांच्या कर्करोगाच्या ट्युमर आपले प्रभावीपण सिद्ध केल्याची ही पहिलीच वेळ नाही. कर्करोग उपचारांच्या इतिहासावर आधारित संशोधनानुसार संसर्गासाठी अँटीबायोटिक्स दिलेले कर्करोग रूग्ण दीर्घकाळ जगले आहेत. त्यांचे प्रमाण नेहमीच्या 45 टक्क्यांवरून 75 टक्के रूग्ण किमान एक वर्ष अधिक जगण्यावर गेले आहे.

हे संशोधनही कर्करोग उपचारांच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. हे संशोधन संशोधक आणि फार्मास्युटिकल प्रयोगशाळांना कर्करोगासाठी नव्या युगातील औषधांचे अँटीबायोटिक्सच्या समावेशासह उत्पादन करण्यासाठी मदत करेल.

( सल्लागार आँकोलॉजिस्ट आणि हिमॅटआँकोलॉजिस्ट, मुंबई)