27 November 2020

News Flash

Airtel आणि Vodafone ग्राहकांना झटका, दोन लोकप्रिय प्लॅन बंद; नवा पर्याय कोणता ?

बंद करण्यात आलेले दोन्ही प्लॅन्स युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्लॅन्सपैकी एक...

Airtel आणि Vodafone-Idea ची दरवाढ आजपासून (3 डिसेंबर) लागू झालीये. तर , Reliance Jio ची दरवाढ 6 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोनने आपल्या नव्या प्लॅन्सची माहिती दिलीये, तर जिओने अद्याप नव्या प्लॅन्सचा खुलासा केलेला नाही. एअरटेल आणि व्होडाफोनने आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्लॅन्सची किंमत वाढवलीये, याशिवाय काही नवे प्लॅन्सही सादर केलेत. मात्र, यासोबतच या कंपन्यांनी आपले दोन लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्स बंद केले आहेत.

एअरटेल आणि व्होडाफोनने 169 रुपये आणि 199 रुपयांचे प्लॅन बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले हे दोन्ही प्लॅन्स युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्लॅन्सपैकी एक होते. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅन्समध्ये दरदिवशी अनुक्रमे एक जीबी आणि 1.5 जीबी डेटा मिळायचा. पण आता कंपनीने याऐवजी नवे प्लॅन्स सादर केले आहेत. नव्या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे कमी-अधिक प्रमाणात आहेत. पण या प्लॅन्ससाठी युजर्सना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आणखी वाचा – ‘जिओ’चा अजून एक दणका, JioFiber च्या जुन्या ग्राहकांनाही बसणार फटका

एअरटेलने रिप्लेस केले 169 आणि 199 रुपयांचे प्लॅन –
एअरटेलने 169 व 199 रुपयांऐवजी 248 रुपयांचा एकच प्लॅन लाँच केला आहे. 169 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस, 1 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएसची सेवा मिळायची. तर, 199 रुपयांमध्ये 28 दिवस वैधता , दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळायचे. याऐवजी लाँच केलेल्या 248 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग केवळ एअरटेलच्याच नेटवर्कवर मिळेल. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिट मिळतील. हे 1000 मिनिट संपल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास प्रतिमिनिट 6 पैसे द्यावे लागतील.

प्रतिदिन 1 जीबी डेटा प्लॅन नाही –
नवे प्लॅन लागू झाल्यापासून एअरटेलच्या कोणत्याही प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळत नाही. 28 दिवसांची वैधता असलेल्या सर्वात स्वस्त 248 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिन 1.5 जीबी डेटा मिळेल. अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी 298 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. आधीच्या 249 रुपयांच्या प्लॅनऐवजी 298 रुपयांचा प्लॅन रिप्लेस करण्यात आला आहे. याशिवाय 84 दिवसांची वैधता असलेल्या 598 आणि 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज अनुक्रमे 1.5 जीबी आणि 2 जीबी डेटा मिळेल. तर, 365 दिवसांची वैधता असलेल्या 2398 रुपयांच्या प्ल्रॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल.

व्होडाफोन-आयडियाने रिप्लेस केले 169 आणि 199 रुपयांचे प्लॅन –
व्होडाफोन-आयडियाने 169 आणि 199 रुपयांच्या प्लॅनऐवजी केवळ 249 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. 169 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवस वैधता, दररोज 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळायचे. तर, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवस वैधता , दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएसची सेवा मिळायची. या दोन्ही प्लॅन्सऐवजी नव्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवस वैधता, प्रतिदिन 1.5 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग केवळ व्होडाफोनच्याच नेटवर्कवर मिळेल. इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिट मिळतील. हे 1000 मिनिट संपल्यानंतर तुम्हाला इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट 6 पैसे द्यावे लागतील.

व्होडाफोनकडेही प्रतिदिन 1 जीबी डेटा प्लॅन नाही –
एअरटेलप्रमाणे आता व्होडाफोनकडेही दररोज 1 जीबी डेटाचा प्लॅन नाहीये. 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. यापेक्षा अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी 299 आणि 399 रुपयांचे प्लॅन आहे, यामध्ये दररोज अनुक्रमे 2GB आणि 3GB डेटा मिळेल. याशिवाय प्रतिदिन डेटा असलेल्या प्लॅनमध्ये 599 आणि 699 रुपयांचे प्लॅन आहेत. यामध्ये अनुक्रमे 1.5GB आणि 2GB डेटा मिळेल. या दोन्ही प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. तर, 365 दिवसांची वैधता असलेल्या 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:56 pm

Web Title: bharti airtel and vodafone idea end rs 169 rs 199 plans with unlimited calls have a look at the new plans sas 89
Next Stories
1 जेवल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर हे नक्की वाचा
2 ‘जिओ’चा अजून एक दणका, JioFiber च्या जुन्या ग्राहकांनाही बसणार फटका
3 Seltos ची जबरदस्त ‘क्रेझ’, सलग दुसऱ्या महिन्यात ठरली नंबर-1 SUV
Just Now!
X