26 February 2021

News Flash

Jio ची जादू संपली? Airtel ने सलग पाचव्या महिन्यात केली मात

सलग पाचव्या महिन्यात Airtel ने Jio ला दिला झटका...

(संग्रहित छायाचित्र )

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला भारती एअरटेलने सलग पाचव्या महिन्यात झटका दिलाय. डिसेंबर 2020 मध्ये सलग पाचव्या महिन्यात एअरटेलने जिओपेक्षा जास्त नवीन युजर आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.

एअरटेल वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ :

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये एअरटेलच्या नेटवर्कवर 40 लाखांपेक्षा जास्त नवीन वायरलेस सब्सक्राइबर आले. तर, जिओचं नेटवर्क घेणाऱ्यांची संख्या केवळ 4.7 लाख होती.

व्होडाफोन-आयडिया सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ:

दुसरीकडे, व्होडाफोन आयडियालाही (Vi) चांगलाच फटका बसलाय. डिसेंबर 2020 मध्ये व्होडाफोन-आयडियाच्या जवळपास 57 लाख युजर्सनी सेवा सोडल्याचं समोर आलंय. व्होडाफोन-आयडियाची सेवा सोडणारे युजर्स एअरटेलच्या नेटवर्ककडे वळत असल्याची शक्यता आहे.

एकूण ग्राहकसंख्या :

ट्रायच्या मोबाइल युजर डेटावरुन, डिसेंबरमध्ये एअरटेलचे ग्राहक वाढून 33.87 कोटी झालेत. तर, जिओची ग्राहकसंख्या वाढून 40.87 कोटी झाली आहे. पण तोट्यात असलेल्या व्होडाफोन आयडियाची ग्राहक संख्या घटून 28.42 कोटी झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:22 pm

Web Title: bharti airtel fifth month in a row adds more number of wireless users than reliance jio sas 89
Next Stories
1 Nokia 3.4 : लेटेस्ट ‘बजेट’ फोनची आजपासून विक्री सुरू, किंमत 11 हजार 999 रुपये
2 Moto E7 Power : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच, किंमत १० हजारांपेक्षाही कमी
3 स्वस्त स्मार्टफोन Poco M3 खरेदी करण्याची पुन्हा संधी ; किंमत 10,999 रुपये
Just Now!
X