News Flash

Airtel चा ग्राहकांना दणका; ‘या’ प्लॅनमध्ये केली दरवाढ

आता मोजावे लागणार अधिक पैसे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारती एअरटेलने सोमवारी 10,000 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे थकबाकीपोटी जमा केले. यासोबतच कंपनीने आपल्या काही पोस्टपेड प्लॅन्सच्या दरांमध्ये वाढ केली आहे, त्यामुळे युजर्सना चांगलाच दणका बसलाय.

TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, Bharti Airtel आपल्या 199 रुपयांच्या अ‍ॅड-ऑन पोस्टपेड प्लॅनची किंमत वाढवून आता 249 रुपये केली आहे. या प्लॅनअंतर्गत मिळणाऱ्या इतर सुविधा पहिल्याप्रमाणेच मिळतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, 100 एसएमएस मिळतील आणि 10 जीबी डेटा मिळेल. एअरटेलने 2017 मध्ये myFamily ही सेवा सुरू केली होती, यामध्ये यूजर्स आपल्या पोस्टपेड प्लॅनचे 25% शुल्क वाचवू शकतात. उदाहरण म्हणजे, 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्स 249 रुपयांचा अ‍ॅड-ऑन पर्याय निवडू शकतात. यासाठी तुम्हाला दरमहिना 499 रुपये द्यावे लागतील. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ आणि 75 जीबी डेटाही मिळेल. याशिवाय एक वर्षासाठी मोफत Amazon Prime मेंबरशिप, Airtel Thanks Rewards, Zee5 आणि Airtel Xstream यासांरख्या अ‍ॅप्सची सुविधा मिळते.

आणखी वाचा – (स्वस्तात घ्या घर-दुकान! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 9:57 am

Web Title: bharti airtel price hike postpaid add on connection rs 199 to rs 249 per month sas 89
टॅग : Bharti Airtel,Mobile
Next Stories
1 आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Google ची फ्री WiFi सेवा
2 झोपेतून उठण्यासाठी गजर लावताय?
3 ‘शाओमी’च्या स्वस्त Redmi 8A Dual चा पहिलाच सेल , मिळेल 5000mAh ची दमदार बॅटरी आणि…
Just Now!
X