News Flash

१५ ऑगस्टला भीम अॅप वापरल्यास मिळेल अधिक कॅशबॅक?

डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी ऑफर

संग्रहित छायाचित्र

डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही सरकारने सुरु केलेले भीम अॅप्लिकेशन वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. १५ ऑगस्टला भीम अॅपचा वापर करणाऱ्यांना एक मोठी कॅशबॅक ऑफर मिळू शकते. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’तर्फे सुरु केलेल्या भीम अॅपला अल्पावधीत ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी या अॅप्लिकेशनची निर्मिती केली होती.

हे डिजिटल व्यवहार आणखी वाढावेत यासाठी अॅप्लिकेशन चालविणाऱ्या कंपनीतर्फे काही वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे कॅशबॅक सुविधेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा यासाठी १५ ऑगस्टला खास ऑफर देण्यात आली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार भीम अॅपचा वापर वाढण्याच्यादृष्टीने कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. यासाठी सरकारकडून अद्याप संमती मिळालेली नसून त्याची आम्ही वाट पाहत आहोत असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए.पी. होटा यांनी सांगितले.

सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्यापासून वेगवेगळी अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या अॅप्लिकेशनकडून ग्राहकांना विविध सुविधा देऊन आकर्षित करण्यात येत आहे. मात्र भीम अॅपतर्फे देण्यात आलेली ही ऑफर नक्कीच वेगळी आणि विशेष ठरेल यात शंका नाही. भीम अॅपकडून मिळणारी ही कॅशबॅक ऑफर १० रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 1:06 pm

Web Title: bhim app users will get cashback bonanza on independence day
Next Stories
1 बालुचारी साडीविषयी माहितीये? 
2 झोपेचं गणित बिघडलंय? ‘हे’ उपाय करुन पाहा
3 टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त
Just Now!
X