16 November 2019

News Flash

Hyundai च्या कार्सवर 2 लाखांपर्यंत डिस्काउंट, विक्री कमी झाल्याने कंपनीचा निर्णय

विक्री कमी झाल्याने Santro, Grand i10, Verna यांसारख्या अनेक कार्सवर मोठ्या प्रमाणात सवलत

विक्री कमी झाल्याने कार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माती कंपनी Hyundai Motors च्या कार्सवर या महिन्यापासून 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही Hyundai ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम वेळ आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट –

Hyundai Santro –
कंपनीची ही सर्वात लोकप्रिय कार असून या गाडीवर 35 हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. यात 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 3 ग्रॅमचं सोन्याचं नाणं अशा ऑफर्स आहेत. 3.90 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरू होते.

Hyundai Grand i10-
या कारवर 95 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल, दोन्ही व्हेरिअंट्ससाठी आहे. यात 50 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 30 हजार रुपये एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 3 ग्रॅमचं सोन्याचं नाणं अशा ऑफर्स आहेत. 4.98 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरू होते.

Hyundai Elite i20 –
या प्रीमियम हॅचबॅक कारवर 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. 5.50 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरू होते.

Hyundai Xcent –
या सब-कॉम्पॅक्ट कारवर तुम्ही 95 हजार रुपयांपर्यंतचं डिस्काउंट मिळवू शकतात. यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 30 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 3 ग्रॅमचं सोन्याचं नाणं अशा ऑफर्स आहेत. 5.72 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरू होते.

Hyundai Verna –
कंपनीच्या या स्टायलिश कारवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात 30 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. 8.08 लाख रुपयांपासून या कारची किंमत सुरू होते.

Hyundai Tucson –
कंपनीच्या या प्रीमियम ‘एसयुव्ही’वर 1 लाख रुपयांपर्यंत सवलत आहे. ही ऑफर पेट्रोल आणि डीझेल दोन्ही व्हेरिअंट्सवर आहे. यात 25 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट आणि 75 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे. 18.75 लाख रुपये इतकी या कारची सुरूवातीची किंमत आहे.

Hyundai Elantra –
या ‘एसयुव्ही’वर कंपनीकडून सर्वाधिक 2 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात तब्बल 1.25 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 75 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. 18.75 लाख रुपयांपासून या एसयुव्हीची किंमत सुरू होते.

First Published on June 10, 2019 2:34 pm

Web Title: big discounts on hyundai cars including verna santro grand i10 sas 89