News Flash

महिंद्राच्या ‘स्कॉर्पिओ’, ‘माराझो’वर आकर्षक डिस्काउंट

एसयुव्ही, एमपीव्ही आणि हॅचबॅक प्रकारातील लोकप्रिय कारवर शानदार सूट

भारतीय कार बाजारात सध्या सर्व कार निर्मात्या कंपन्या गेल्या वर्षीचा उरलेला स्टॉक अद्यापही पडून असल्यामुळे नव्या कार खरेदीवर आकर्षक सवलत देत आहेत. मारुती सुझुकीनंतर महिंद्रा कंपनीनेही आपल्या अनेक लोकप्रिय कारच्या खरेदीवर दमदार सूट जाहीर केली आहे. यात एसयुव्ही, एमपीव्ही आणि हॅचबॅकचा समावेश आहे.

पाहुयात कोणत्या कारवर किती सवलत –

महिंद्रा Marazzo –
महिंद्रा माराझो ही कार कंपनीने गेल्या वर्षी बाजारात उतरवली असून ग्राहकांच्या ही कार चांगलीच पसंतीस उतरली आहे. या कारच्या 2018 च्या स्टॉकवर 20,000 रुपयांचे डिस्काउंट देण्यात येत आहे.

महिंद्रा TUV300 –
या कारवर 75 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. विकल्या न गेलेल्या कार डिलरशीपकडे अधिक संख्येने पडून असल्याने या मॉडलवरील सवलत अधिक वाढण्याची शक्यता आहे.

महिंद्रा Scorpio –
ही कार कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय कार असून महिंद्रा स्कॉर्पिओ 2018 एडिशनवर 85,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. कंपनीकडून S5, S7 आणि S11 या व्हेरिअंटवर डिस्काउंट दिलं जात आहे. या कारमध्ये 2.2 लिटरचं डिझेल इंजन देण्यात आलंय.

महिंद्रा XUV500 –
2011 मध्ये लाँच झालेल्या या SUV वर कंपनी 75,000 रुपयांची सवलत देत आहे. ही कार 2.2 लिटर डिझेल इंजिन आणि 2.2 लिटर पेट्रोल इंजिनच्या पर्यायासह उपलब्ध आहे. या कारचं 2018 एडीशन आता 75,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 4:04 pm

Web Title: big discounts on mahindra cars
Next Stories
1 ‘पबजी’मध्ये झोम्बींची एन्ट्री, उद्यापासून ‘झोम्बी मोड’!    
2 मारुतीच्या ‘प्रीमियम’ कार्सवर 1 लाखापर्यंत घसघशीत सूट
3 जीवन विमा खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा
Just Now!
X