सध्या बाजारपेठेत विविध कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसते. मोठमोठे मॉल आणि दुकानांबरोबरच ऑनलाईन मार्केटही यामध्ये मागे नाही. घरबसल्या ऑनलाईन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत असताना ऑनलाईन कंपन्या आपल्या ग्राहकांना अनोख्या ऑफर्स देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यातही काही खास दिवसांचे निमित्त साधत या ऑफर्स जाहीरही केल्या जातात. काही दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत ऑनलाईन कंपन्यांनी अशाचप्रकारच्या ऑफर्स नुकत्याच जाहीर केल्या आहेत. फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलच्या खरेदीवर विशेष सूट दिली असून तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच असायला हवी.

१० ऑगस्टपासून हा सेल सुरु होणार असून तो १२ ऑगस्टपर्यंत असेल. या सेलचे नाव बिग फ्रीडम सेल असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅपल, सॅमसंग, रेडमी, ऑनर हे स्मार्टफोन कमी किंमतीत मिळणार आहेत. ऑनर ७ ए हा फोन ७,९९९ रुपयांना मिळणार आहे. रेड मी ५ प्रोवर १ हजार रुपयांची जास्तीची एक्स्चेंज ऑफर मिळणार आहे. तर अॅपलचा आयफोन एसई १६,९९९ रुपयांना मिळेल. असूस कंपनीचा झेनफोन मॅक्स प्रो एम१ १०,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. ऑनर ९ लाईटवर ३ हजार रुपयांचा जास्तीची एक्स्चेंज ऑफर मिळणार असून तो १०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. गुगल पिक्सल २ आणि २ एक्सएल हा फोन ४१,९९९ रुपयांना असून त्यावर ३१ हजार रुपयांची बायबॅक ऑफर मिळणार आहे. सॅमसंग ऑन ८ हा फोन १६,९९० रुपयांना, सॅमसंग गॅलॅक्सी ऑन १३,४९० रुपये, गॅलॅक्सी नेक्स्ट १०,९९० रुपये, तर गॅलॅक्सी जे ३ प्रो ६,४९० रुपयांना खरेदी करता येणार आहे.

याशिवाय सध्या फ्लिपकार्टवर शाओमी रेडमी ५ ए (Xiomi Redmi 5 A) या फोनवर आज सेल आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध असून महिन्याला २०० रुपयाचा हप्ता भरुन हा फोन घेता येणार आहे. हे डिस्काऊंट अॅक्सिस बँकेच्या क्रेडीट कार्डवर खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे. एक व्यक्ती एका महिन्यात दोन फोनची खरेदी करु शकेल. या फोनच्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ५,९९९ रुपये आहे तर ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे.