News Flash

‘सुपर बाइक’चे नवे पर्याय

करोनाच्या पहिल्या लाटेत ठप्प झालेला वाहन उद्योग टाळेबंदीनंतर सावरत असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि नवे निर्बंध लागू करण्यात आले.

करोनाच्या पहिल्या लाटेत ठप्प झालेला वाहन उद्योग टाळेबंदीनंतर सावरत असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि नवे निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा वाहन उद्योग अस्थिर झाला. टाळेबंदीनंतर सर्वच प्रकराच्या वाहनांना वाढत असलेली मागणी पाहता वाहन उत्पादककंपन्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. मात्र नवे निर्बंध लागू झाल्याने या सर्व योजना मागे पडल्या. यात नवीन वाहने बाजारात उतरविण्याच्या तयारीत कंपन्या होत्या. मात्र दुसऱ्या लाटेत वाहन विक्रीची बंद झालेली दालनं, कच्च्या मालाचा प्रचंड तुटवडा आणि कमी झालेली मागणी पाहता सर्व नवीन योजना गुंडाळून ठेवल्या होत्या. आता करोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने अनेक शहरांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने वाहन उत्पादक कंपन्यांनी आपली दालने उघडण्यास सुरुवात केली असून नवीन वाहनेही बाजारात येत आहेत. यात चारचाकी कंपन्यांनी अद्याप आपले नवे पर्याय समोर आणले नाहीत, मात्र दुचाकी उत्पादक कंपन्यांनी आपले पर्याय खुले करण्यास सुरुवात केली आहे. यात ‘सुपर बाइक’चे पर्याय पहिल्या टप्प्यात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या महिनाभरात अनेक ‘सुपर बाइक’ बाजारात येत आहेत. तशी तयारी कंपन्यांनी सुरू केली आहे.

‘निंजा ३००’ची विक्री सुरू

कावासाकी या दुचाकी निर्मात्या कंपनीने नुकतेच समाजमाध्यमांवर आपली विक्री दालने खुली करीत असल्याचे जाहीर केले आहे. दिल्ली, नागपूर, सुरत, अहमदाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, हैद्राबाद आणि इंदूर या शहरांतील दालनं खुली करण्यात आली असून मार्चमध्ये बाजारात आलेल्या मात्र करोनामुळे ब्रेक लागलेल्या कावासाकी ‘निंजा ३००’ची विक्री सुरू केली आहे.

एफ झेड १५०

यामाहा इंडिया या कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की, ते त्यांच्या ‘एफ झेड १५०’चे अनावरण ऑनलाइन माध्यमातून १८ जून रोजी करणार आहेत. ही दुचाकी एप्रिलमध्ये रस्त्यावर तपासणीदरम्यान आढळली होती. यामाहा ‘एस आर १५५’सारखीच तिची रचना असून  बॉक्सी फ्यूएल टँक, रेज्ड सिंगल पीस हँडल बार, रेडिएटर गार्ड आणि एलईडी टेललाइट देण्यात आली आहे. प्रत्यक्षात बाजारात आल्यानंतरच त्याबाबत अधिकची माहिती मिळू शकेल.

‘बीएमडब्लू एस१००० आर ’

बीएमडब्ल्यू मोटर्राडने नुकतीच ‘एस १०००’चा एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. त्यामुळे ही दुचाकी लवकरच बाजारात येईल असे संकेत मिळत आहेत. ही दुचाकी यूरो ५ / बीएस ६ इंजिनानुसार सुधारित करण्यात आली असून त्यात नवीन बॉडी पॅनल, एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट आणि डीआरएल दिवे देण्यात आले आहेत. यात ‘कनेक्ट’ सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘ब्लूटूथ’च्या माध्यमातून स्मार्टफोनशी जोडता येणार आहे. ‘नॅव्हिगेशन’ची सुविधाही मिळणार आहे. या दुचाकीची १८ लाख इतकी किंमत जाहीर करू शकते असा अंदाज आहे.

‘ट्रायम्फ’ने नुकतीच आपल्या स्पीड ट्विन (Speed Twin) या दुचाकीची पूर्वनोंदणी सुरू केली आहे.  यासाठी ५० हजार रुपये आगाऊ नोंदणी शुल्क घेतले जात आहे. पुढील काही आठवडय़ांत ही दुचाकी भारतीय बाजारात येत आहे. नोंदणीबरोबर कंपनीने विक्री दालने उघडण्यास प्राधान्य दिले आहे.

डुकाटीच्या दोन ‘सुपर बाइक’

डुकाटी या दुचाकी कंपनीने ‘पेनिगेल व्ही ४’ आणि ‘डियावेल १२६०’ या दोन सुपर बाइक बाजारात आणल्या आहेत. २३.५० लाख आणि १८.४९ लाख अशी क्रमश: दुचाकींची किंमत जाहीर करण्यात आली  असून कंपनीच्या विक्री दालनात नोंदणी सुरू केली आहे.

‘पेनिगेल व्ही ४’ या सुपर बाइकला ‘बीएस ६’ ११०३ सीसी इंजिन दिले असून ते १३,००० आरपीएमवर २१४ एचपीची शक्ती आीण ९५०० आरपीएमवर १२४ न्यूटन मीटरचा टॉर्क देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

‘डियावेल १२६०’ या दुचाकीचे पूर्वीपेक्षा ५ किलो वजन अधिक करण्यात आले आहे. १२६२ सीसीचे इंजिन दिले असून ही दुचाकी ९५०० आरपीएमवर १६२ बीएचपीची शक्ती देते तर ७५०० आरपीएमवर १२९ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो.

‘अपाचे आरआर ३१०’

टीव्हीएस कंपनी ‘अपाचे आरआर ३१०’ या दुचाकीवर गेली अनेक दिवस काम करत असून लवकरच ती दुचाकीप्रेमींना खरेदी करता

येणार आहे. ही दुचाकी एप्रिलमध्ये बाजारात येणार होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिचे अनावरण पुढे ढकलण्यात आले होते. या महिन्यात ही दुचाकी बाजारात आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. ही दुचाकी ‘बीएम डब्ल्यू जी ३१० आर’प्रमाणे बनविण्यात आली आहे. यात इन्स्ट्रमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट आणि एलईडी टेललाइट दिली जाईल. ३१२.७ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात येणार असून ते ३४ बीएचबी शक्ती आणि २७.३ एनएम टॉर्क निर्माण करते.

विद्यार्थी वाहतूक..अशी घ्या काळजी!

  • शालेय विद्यर्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनास होणारे अपघात व त्यांची सुरक्षितता याचा विचार करून त्याबाबत नियमांची अधिकाधिक कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे व त्यामध्ये वारंवार सुधारणा होत आहे.
  • शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कंत्राटी परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सक्षम प्राधिकारी आहेत.
  • संबंधित वाहनाचा रंग पिवळा असावा. त्यावर १५ एमएमचा विटकरी पट्टा, शाळेचे नाव व स्कूल बस असे लिहिणे बंधनकारक आहे.
  • संबंधित वाहन मूळ नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जास्त व मुंबईसाठी ८ वर्षांपेक्षा जास्त जुने नसावे. विद्यार्थी यादी त्यांच्या संपूर्ण माहितीसह वाहनाचा मार्ग व नियमांच्या प्रयोजनासाठी शिक्षक असणे आवश्यक आहे.
  • शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या थांब्यावर अधिकृत व्यक्ती नसल्यास इतरांच्या सोबत देण्यात येणार नाही.
  • बसचालकास संबंधित प्रवर्गाचे वाहन चालविण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
  • वाहनांवर स्कूलबस व दोन मुलांचे चित्र असावे, तसेच शाळेची ओळख दर्शविणारा फलक असावा.
  • वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी, दोन अग्निशामके, आसनाखाली बॅग ठेवण्याची सोय व चढण्याची शेवटची पायरी जमिनीपासून २०० मि. मि. पेक्षा उंच नसावी. त्याप्रमाणे प्रेशर हॉर्न नसावे.
  • वाहनाची संपूर्ण बॉडी स्टीलची असावी. मध्यम किंवा जड प्रवासी वाहनास तीन आडवे स्टील दांडे ५ सें. मी. अंतरावर असावे व वाहनाच्या डाव्या मागच्या बाजूस संकटकालीन मार्ग असावा.
  • विद्यार्थी मित्रांनो, वरील प्रकारची रचना असणाऱ्या वाहनांमधूनच प्रवास करावा व पालकांनीही त्यासाठीच आग्रह धरावा. कोणत्याही वाहनामध्ये विद्यार्थी वहन क्षमता ही नियमित क्षमतेपेक्षा दीडपट असते.

ट्रॅफिक सेन्स.. अनिल पंतोजी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:48 am

Web Title: bike new models road highway corona relaxation bike showroom ssh 93
Next Stories
1 पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्या; जाणून घ्या ८ खास टीप्स
2 लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या
3 रात्री उशिरा  जेवणाचे तोटे
Just Now!
X