News Flash

Black Shark 2 : ‘शाओमी’चा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी

या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरशिवाय डायरेक्ट टच मल्टीलेयर लिक्विड कुलिंग फीचर देखील

शाओमी कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात लाँच केलेला ‘ब्लॅक शार्क 2′ हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी आहे. आज या स्मार्टफोनसाठी भारतात पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन संकेतस्थळ फ्लिपकार्टवर 12 जून रोजी अर्थात आज दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल सुरू होत आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ‘नो कॉस्ट इएमआय’चा पर्याय फ्लिपकार्टकडून देण्यात आला आहे, याशिवाय अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के सवलत देखील मिळेल.

यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरशिवाय डायरेक्ट टच मल्टीलेयर लिक्विड कुलिंग फीचर देखील आहे. या फीचरद्वारे मोठे आणि ऑनलाइन गेम्स खेळतानाही फोन गरम होत नाही. Black Shark 2 च्या बेसिक मॉडेल अर्थात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. तर प्रीमियम मॉडल (12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज) ची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्रोजन सिल्वर, ग्लोरी ब्ल्यू आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेन.  मार्च महिन्यामध्ये हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये गेमिंग आर्टिफिशियल इंटेलीजंसचा वापर करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. गेमर्सच्या सोयीसाठी फोनच्या चारही बाजूंना प्रेशर सेंसिटिव्ह सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.

फीचर्स – Black Shark 2 मध्ये Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340) AMOLED डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. 4,000 mAh क्षमतेची आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी यामध्ये आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे तर दुसरा 12 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी यामध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 9:22 am

Web Title: black shark 2 to go on sale flipkart
Next Stories
1 LG ने आणला जगातील पहिला 8k OLED टिव्ही
2 Saregama ने लाँच केलं ‘कारवां’चं मोबाईल व्हर्जन; किंमत 3,990 रुपये
3 पहिली इंटरनेट कार, MG Hector साठी उद्यापासून बुकिंग सुरू
Just Now!
X