वाढत्या वजनामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना काळा चहा प्राशन करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. काळय़ा चहाचे सेवन केल्यामुळे चयापचय प्रक्रियेला चालना देणाऱ्या जीवाणूची वाढ होऊन त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते असे एका नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले आहे.

उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगामंध्ये काळय़ा चहामुळे आतडय़ांमधील जीवाणूंचे गुणोत्तर बदलल्याचे अमेरिकेतील कलिफोर्निया विदय़ापीठ, लॉस एंन्जेलिसमधील शास्त्रज्ञांना आढळले. या अभ्यासात लठ्ठपणाशी संबंधित असलेल्या जीवाणूचे प्रमाणात घट झाली तर सडपातळ शरीरयष्टीशी संबंधित जीवाणूच्या प्रमाणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. हा नवा अभ्यास ‘युरोपियन जर्नेल आफ न्युट्रिशन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. काळय़ा चहामध्ये आढळणाऱ्या ‘पॉलिफेनाल’ यांचा आकार मोठा असल्यामुळे ते लहान आतडय़ांमध्ये शोषून घेता येत नाही, त्याचप्रमाणे ते आतडय़ातील जीवाणू आणि मेदयुक्त आम्लाच्या वाढीला चालना देतात. या जीवाणूमुळे यकृतामधील चयापचय प्रक्रियेत बदल होत असल्याचे आढळले आहे. काळा चहा हा प्रिबायोटिक असून त्यामुळे आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांची यामुळे वाढ होते. आतडय़ातील मायक्रोबाइमच्या विशिष्ट यंत्रणेमुळे काळा चहा मानवांना आरोग्यदायी त्याचप्रमाणे वजन कमी करण्यास मदत करण्याची शक्यता असल्याचे कलिफोर्निया विदय़ापीठ, लॉस एंन्जेलिसच्या प्राध्यापिका सुझेन हेनिंग यांनी सांगितले. संशोधकांनी या अभ्यासासाठी चार गटातील उदरांना वेगवेगळा आहार दिला होता, तर दोन गटांतील उदरांना काळय़ा चहाचा अर्क देण्यात आला होता.