डॉ. गंधाली देवरुखकर पिल्लई, स्त्रीरोगतज्ज्ञ

  •    गर्भाशयाशी संबंधित अस्वाभाविक रक्तस्रावाची लक्षणे

दोन मासिक पाळ्यांच्या अधेमधे योनीमार्गातून होणारा रक्तस्राव हे गर्भाशयाशी संबंधित अस्वाभाविक रक्तस्रावाचे एक लक्षण आहे. मासिक पाळीदरम्यान खूप जास्त रक्तस्राव होणेही अस्वाभाविक रक्तस्रावाचे लक्षण समजले जाते. मासिक पाळीदरम्यान खूप जास्त रक्तस्राव किंवा सात दिवसांहून अधिक काळार्पयच चालणारा रक्तस्राव याला मेनोऱ्हेजिया असे म्हटले जाते. उदाहरणार्थ एक तासात होणारा रक्तस्राव शोषण्यासाठी एक किंवा त्याहून अधिक सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पून्सची गरज भासणे.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा
  •   गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव होण्याची कारणे काय आहेत?

गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव होण्यास अनेकविध गोष्टी जबाबदार आहेत. गर्भारावस्था हे एक नेहमी आढळणारे कारण आहे. गर्भाशयातील पोलिप्स किंवा फायब्रॉइड्स (लहान किंवा मोठय़ा वाढलेल्या) यांच्यामुळेही रक्तस्राव होऊ  शकतो. क्वचित थायरॉइडच्या समस्येमुळे, गर्भाशयमुख अर्थात सव्‍‌र्हिक्सला झालेल्या प्रादुर्भावामुळे किंवा गर्भाशयाच्या कर्करोगामुळेही अस्वाभाविक रक्तस्राव होऊ  शकतो. बहुतेक स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव होतो.

हार्मोन्सच्या कारणामुळे गर्भाशयातून रक्तस्राव होत असेल तर डॉक्टर या समस्येला डिसफंक्शनल युटेराइन ब्लीडिंग किंवा डीयूबी म्हणतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अस्वाभाविक रक्तस्राव होणे सहसा पौगंडावस्थेतील मुलींमध्ये किंवा रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) जवळ आलेल्या स्त्रियांमध्ये आढळते.

गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्रावाला कारणीभूत असलेल्या या काही थोडय़ा समस्या आहेत. या समस्या कोणत्याही वयाला निर्माण होऊ  शकतात पण गर्भाशयातून होणाऱ्या अस्वाभाविक रक्तस्रावाचे संभाव्य कारण तुमच्या वयावर अवलंबून असते.

  •   पौगंडावस्थेत, विशीत, तिशीत असलेल्या स्त्रिया..

तरुण स्त्रिया व पौगंडावस्थेतील मुलींमध्ये होणाऱ्या अस्वाभाविक रक्तस्रावाचे कारण म्हणजे गरोदरावस्था. सामान्य गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत अनेक स्त्रियांना विचित्र रक्तस्राव होतो. काही गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंट्रायुटेराइन उपकरणांमुळेही (आययूडी) अस्वाभाविक रक्तस्राव होऊ शकतो. गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव असलेल्या काही तरुण स्त्रियांमध्ये त्यांच्या मासिक पाळीदरम्यान अंडाशयातून अंडे सोडले जाण्याची प्रक्रिया (ओव्हल्युशन) होत नाही. नुकतीच मासिक पाळी आलेल्या पौगंडावस्थेतील मुलींमध्ये तर अनेकदा आढळते. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते. यात तुमच्या शरीरातील इस्ट्रोजनपासून निर्माण होणारे गर्भाशयाची अस्तर (याला एण्डोमेट्रिअम असे म्हणतात) खूप जाड होईपर्यंत वाढते. मासिक पाळीच्या काळात जेव्हा हे अस्तर शरीरातून बाहेर टाकले जाते, तेव्हा प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होतो. हार्मोन्समधील असंतुलनामुळे हे अस्तर नेमके कधी बाहेर टाकायचे हेही तुमच्या शरीराला कळत नाही. त्यामुळे मासिक पाळीनंतर मध्येमध्येही अनियमितपणे रक्तस्राव (स्पॉटिंग) होत राहाते.

  •   चाळिशीतील तसेच पन्नाशीची सुरुवात झालेल्या स्त्रिया

रजोनिवृत्तीपूर्वीच्या वर्षांमध्ये तसेच रजोनिवृत्ती सुरू झाल्यानंतर काही महिने स्त्रियांमध्ये ओव्हल्युशन होत नाही. यामुळे गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव होऊ  शकतो. यामध्ये अतिरक्तस्राव तसेच कमी व अनियमित रक्तस्रावाचा समावेश होतो. गर्भाशयाची अस्तर जाड होणे हे चाळिशी व पन्नाशीतील स्त्रियांमधील रक्तस्रावाचे एक कारण आहे. हे अस्तर जाड होणे म्हणजे गर्भाशयाशी निगडित कर्करोगाचा इशारा असू शकतो. तुम्हाला गर्भाशयातून अस्वाभाविक रक्तस्राव होत असेल आणि तुम्ही या वयोगटात असाल तर तुम्ही हे डॉक्टरांना सांगणे आवश्यक आहे. हा कदाचित वाढत्या वयाचा परिणाम असू शकेल पण याचे कारण कर्करोग नाही याबद्दल खात्री करणे गरजेचे आहे.

  •  रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया

रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयातून रक्तस्राव होण्याचे नेहमी आढळणारे कारण म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट उपचार. अन्य कारणांमध्ये गर्भाशयाच्या अस्तराचा (एण्डोमेट्रिअल) किंवा गर्भाशयाशी निगडित कर्करोग हे असू शकते. हा कर्करोगाचा प्रकार तरुण स्त्रियांच्या तुलनेत वयस्कर स्त्रियांमध्ये अधिक आढळतात. मात्र गर्भाशयातून होणाऱ्या अस्वाभाविक रक्तस्रावाचे कारण नेहमी कर्करोग हेच असते असे नाही. अन्य अनेक कारणांनी रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होऊ  शकतो. म्हणूनच रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव झाल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे.

  •    गर्भाशयातून होणाऱ्या अस्वाभाविक रक्तस्रावाला प्रतिबंध करता येतो किंवा ते टाळता येते?

तुमच्या गर्भाशयातून होणाऱ्या अस्वाभाविक रक्तस्रावाचे कारण हार्मोन्समधील बदल असेल, तर तुम्हाला ते टाळता येणार नाही. मात्र हे हार्मोन्स बदल वाढलेल्या वजनामुळे होत असतील, तर वजन कमी करणे उपयुक्त ठरू शकते. तुमच्या वजनाचा परिणाम हार्मोन्सच्या निर्मितीवर होतो. निरोगी वजन राखल्यास गर्भाशयातून होणारा अस्वाभाविक रक्तस्राव टाळण्यात मदत होऊ  शकते.

गर्भाशयातून होणारा अस्वाभाविक रक्तस्राव म्हणजे गर्भाशयातून होणारा(योनीमार्गाद्वारे) होणारा अति किंवा नेहमीसारखा नसलेला रक्तस्राव होय. हा तुमच्या मासिक चक्रादरम्यान कधीही होऊ शकतो. तुमच्या सामान्य मासिक पाळीदरम्यानही तो होऊ शकतो.