27 February 2021

News Flash

रक्तदाबाचे निरीक्षण करणारे अ‍ॅप विकसित

भारतीय वंशाच्या संशोधकांनी रक्तदाबाचे निरीक्षण करणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.

| March 12, 2018 03:30 am

प्रतिनिधिक छायाचित्र

भारतीय वंशाच्या संशोधकांनी रक्तदाबाचे निरीक्षण करणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाबाची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकेल.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी हे अ‍ॅप अधिक सोईस्कर असल्याचे सांगितले आहे. आम्ही वेगवेगळ्या धमण्यांवर लक्ष केंद्रित केले. आतील बाजूस वळणाऱ्या धमण्यांचीही अचूक माहिती या अ‍ॅपमुळे मिळू शकेल, असे संशोधक आनंद चंद्रशेखर यांनी सांगितले.

बोटावरून रक्तदाबाची सहजपणे माहिती मिळविता येणार असल्यामुळे हे अ‍ॅप सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असे चंद्रशेखर यावेळी म्हणाले. हे संशोधन ‘सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

या अ‍ॅपमध्ये दोन संवेदक वापरण्यात आले आहेत. त्यामुळे रक्तदाबाची अचुकता मोजणे सहज शक्य झाले आहे. अ‍ॅप सुरू केल्यानंतर संवेदकावर बोट ठेवल्यास हृदयाची प्रक्रिया सुरुळीतपणे सुरू आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे, असे प्राध्यापक रामकृष्णा मुक्कमल यांनी स्पष्ट केले. आम्ही केलेल्या संशोधनानुसार ९० टक्के लोक या अ‍ॅपचा अगदी सहजपणे वापर करू शकतील, असे मुक्कमल म्हणाले.

उच्च रक्तदाब आणि उपचारांची आवश्यकता असल्यास तशा प्रकारची सूचना अ‍ॅपमध्ये मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 3:30 am

Web Title: blood pressure monitoring app develops
Next Stories
1 व्हॉटसअॅपचे व्हॉईस रेकॉर्डिंग होणारे सोपे
2 परीक्षांच्या काळात ‘अशी’ घ्या मुलांच्या झोपेची काळजी
3 अशापद्धतीने घरीच तयार करा फाऊंडेशन पावडर
Just Now!
X