22 July 2019

News Flash

ब्लु स्मार्ट आणि जिओ यांची होणार हातमिळवणी

गुरूग्राममधील इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट स्टार्ट-अप ब्लु स्मार्ट मोबिलिटी आपल्या सर्व उत्पादनांमध्ये डाटा सेवा देण्यासाठी सध्या जिओमनी या आरआयएल समूहाच्या डिजिटल वॉलेटशी व रिलायन्स जिओशी बोलणी करत

गुरूग्राममधील इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट स्टार्ट-अप ब्लु स्मार्ट मोबिलिटी आपल्या सर्व उत्पादनांमध्ये डाटा सेवा देण्यासाठी सध्या जिओमनी या आरआयएल समूहाच्या डिजिटल वॉलेटशी व रिलायन्स जिओशी बोलणी करत आहे. सौरऊर्जा सेवेतील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या जेनसोलच्या पाठिंब्याने ब्लु स्मार्टने 100 महिंद्रा ईव्हेरिटोसमार्फत या वर्षी कार्यास सुरुवात केली. सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कंपनी कोका-कोलाशी संपर्क करत आहे. कंपनीने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) ऑनलाइन कॅशलेस पेमेंटसाठी पेटीएमशी भागीदारी केलेली आहे. जिओबरोबरच्या सहयोगाद्वारे, कंपनीला आपल्या ग्राहकांना कण्टेण्ट, मनोरंजन व वाय-फाय द्यायचे आहे. “जिओ व पेटीएम यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळत आहे आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर याच हेतूने काम करायचे आहे.

ब्लु स्मार्टच्या एनसीआरमधील सर्व 100 कारना पेटीएम कॅशलेस सेवेचे पाठबळ आहे,” असे ब्लु स्मार्टचे सह-संस्थापक पुनित गोयल यांनी सांगितले. शेअर्ड मोबिलिटी, इलेक्ट्रिक सस्टेनेबल मोबिलिटी, सुरळित कॅशलेस पेमेंट्स व कारमघ्ये गरजेनुसार कण्टेण्ट व वाय-फाय सेवा देऊन ग्राहकांचा अधिकाधिक सहभाग यांचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढवत असल्याचे गोयल म्हणाले. कंपनीने महिंद्रा ईव्हेरिटोजची एकूण संख्या 1.200 पर्यंत नेण्याचे ठरवले आहे, त्याशिवाय 300 टाटा टायगोर इलेक्ट्रिक कार्स व 25 BMWi3 यांचाही समावेश केला जाणार आहे. “2019 या वर्षात BMW i3 ची संख्या 50 पर्यंत वाढवण्याचे आणि 25 जॅग्वार I-PACE चा समावेश करण्याचे नियोजन आहे. 2020 मध्ये जॅग्वारची संख्या 100 पर्यंत वाढवली जाईल. आम्ही कॉर्पोरेट ग्राहकांना हाय-एंड कार देणार आहोत, जेणे करून त्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल आणि घसारा होणारी मालमत्ता खरेदी करावी लागणार नाही,” असे गोयल यांनी स्पष्ट केले. कंपनी आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठी सुरळीत वाहतूक सुविधा देते. कंपनी कोका-कोलासाठी 100 कारनी सुरुवात करणार आहे आणि विविध कॉर्पोररेट ग्राहकांसाठी 1,500 कारपर्यंत विस्तार करणार आहे.

“त्यांच्याकडून विश्वासार्ह व खात्रीशीर कर्मचारी वाहतूक सेवेसाठी किफायतशीर दरामध्ये सुरळित, माफक, गरजेनुसार, दर्जेदार सेवेला प्रचंड मागणी आहे,” असे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहतूक सेवा देत असताना वाहनांच्या खात्रीशीर चार्जिंगची गरज असल्याने ब्लु स्मार्ट स्वतःची चार्जिंग स्टेशन निर्माण करत आहे. ही स्टेशन झटपट चार्जिंग करून घेण्यासाठी लोकांसाठीही खुली असतील. सध्या, कंपनीची गुरूग्राममध्ये अशी 10 चार्जिंग स्टेशन आहेत, परंतु डिसेंबर 2019 पर्यंत देशभर 500 शेअर्ड चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. यातील काही स्टेशन रिअल इस्टेट विकसकांबरोबर भागीदारीने साकार केली जातील, जसे मुंबईमध्ये लोढा ग्रुप. “हा निर्णय रेव्हेन्यू-शेअरिंग मॉडेलद्वारे प्रत्यक्षात आणला जाऊ शकतो आणि दिवसातील विशिष्ट वेळेमध्ये चार्ज केले जाणार नाही,” असे गोयल यांनी सांगितले.

चार्जिंग स्टेशन भारत चार्ज, कम्बाइन्ड चार्जिंग सिस्टीम (सीसीएस) व CHAdeMO प्रमाणकांचे पालन करतील. सीसीएस प्रमाणके ही युरोपीय व अमेरिकन कार्ससाठी आहेत, तर CHAdeMO प्रमाणके ही जपानी, कोरिअन व चिनी कारसाठी वापरली जातात. शहरांतर्गत व आंतरशहर फेऱ्यांसाठी, मे 2019 पर्यंत कारशेअरिंग सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग व इलेक्ट्रिक बस व ऑटोरिक्षा सेवांचाही विचार करत आहे.

First Published on March 9, 2019 6:25 pm

Web Title: blu smart mobility in talks with jiomoney for data services