ख्यातनाम कार निर्माता कंपनी BMW ने भारतात आपली नवी कार BMW M5 Competition भारतात लाँच केली आहे. ही कार अवघ्या 3.3 सेकंदात 0 ते 100 कि.मी. प्रति. तास इतका वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. M5 Competition दिसायला आपल्या स्टँडर्ड व्हर्जनप्रमाणेच आहे. मात्र या एडिशनमध्ये काही नवे फीचर्स दिले आहेत.

इंजिन –
या कारमध्ये स्टँडर्ड BMW 5 मध्ये दिलेल्या इंजिनचाच वापर करण्यात आला आहे. यात 4.4 लीटर ट्विन टर्बो V8 मोटर असून ही मोटर 616 bhp ऊर्जा आणि 750Nm टॉर्क निर्माण करते.

फीचर्स –
डायनेमिक स्टेबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, डायनेमिक ब्रेक कंट्रोल असे नवे फीचर्स यामध्ये आहेत. या व्हर्जनमध्ये रेडिएटर ग्रील, विंग मिरर, रिअर अप्रॉन, रिअर स्पॉइलर असे फीचर्स असून कारचं छत लाइटवेट आणि हाय टेंसाइल कार्बन फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. M5 प्रमाणे या गाडीतही M xDrive ऑल वील ड्राइव्ह सिस्टिम दिलेली आहे. गाडीत DSC आणि xDrive मोड्स दिलेले आहेत. यामुळे चालकाला 4WD, 4WD Sport आणि 2WD या मोडमध्ये कोणताही एक मोड निवडण्याचा पर्याय मिळतो.

आणखी वाचा- Toyota Glanza 24 हजारांनी स्वस्त, नवीन व्हेरिअंट लाँच

किंमत –
स्टँडर्ड BMW M5 व्हर्जनपेक्षा नवीन BMW M5 Competition 10 लाख रुपयांनी महाग आहे. भारतात 1.55 कोटी रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत आहे.