News Flash

Audi ला टक्कर देण्यासाठी भारतात दाखल होणार BMW ची स्पोर्ट्स कार

बीएमडब्ल्यूची 'M2' ही स्पोर्ट्स कार पुढील काही महिन्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जर्मनीतील लक्झरी आणि स्पोर्ट्स कारमेकर बीएमडब्ल्यू लवकरच भारतात स्पोर्ट्स कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. बीएमडब्ल्यूची ‘M2’ ही स्पोर्ट्स कार पुढील काही महिन्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतात लॉन्च करण्यात येणाऱ्या या कारमध्ये विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. ही कार स्टॉक व्हर्जनपेक्षाही जलद असणार असून यामध्ये हॅण्डलिंग आणि ब्रेकिंगचा परफॉर्मन्स सर्वोत्तम असेल याची काळजी घेण्यात आली आहे. भारतात ‘M2’ ची मुख्य स्पर्धा Audi TT RS सोबत असेल जी एक स्पोर्ट्स कार आहे. या कारची किंमत ८५ लाखांपर्यंत (एक्स-शोरुम दिल्ली) असणार आहे.

बीएमडब्ल्यू इंडिया ही कार जर्मनीतून कंप्लीटली बिल्ट युनिट (CBU) च्या धर्तीवर आयात करण्यात येणार असून, लोकल असेम्बल करण्याची कोणतीही योजना नाहीये. यामुळेच कारची किंमत जास्त असणार आहेत. ज्यांना कॉम्पॅक्ट सेदानची इच्छा आहे तेच ग्राहक ‘M2’ चे मुख्य टार्गेट आहेत.

BMW M2 कारमध्ये चौघांना बसण्याची सुविधा असली तरी दोनच दरवाजे आहेत. यामुळे मागच्या सीटवर बसणाऱ्यांना थोडे कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे शक्यतो या कारमध्ये दोनच जण प्रवास करणं पसंत करतील.

कारमध्ये तीन लिटरचं सहा सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ट्विन टर्बोचार्जर्स सोबत असेल. ही कार ४०५ हॉर्सपॉवर आणि ५५० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारासाठी या कारमध्ये ७ स्‍पीड ड्यूअल क्‍लच ऑटोमॅटिक ग‍िअरबॉक्‍स देण्यात आला आहे. BMW M2 सोबत इंटरनॅशनली ६ स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्सची सुविधा देत असून, भारतात ही सुविधा देण्यात आलेली नाही.

स्पीडबद्दल बोलायचं झाल्यास M2 ही कार ४.२ सेकंदात १००Kph वेगाने धावेल. कारचा टॉप स्पीड २५० Kmph असणार आहे. रोज स्पोर्ट्सकार चालवण्याची आवड असणाऱ्यांना ही कार नक्कीच आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:03 pm

Web Title: bmw sportscar m2 to launch in india
Next Stories
1 Ford इकोस्पोर्ट कारचे नवे एडिशन दाखल
2 TOP 5 : नववधू प्रिया मी बावरते, कानच्या रेड कार्पेटवर सोनमचा ‘खुबसूरत’ अंदाज
3 असे करा तुमच्या मुदत ठेवींचे नियोजन
Just Now!
X