बाजारामध्ये सध्या नवनवीन फॅशनचा ट्रेण्ड येत आहे. प्रत्येक ऋतूप्रमाणे हा ट्रेण्ड बदलत जातो. विशेष म्हणजे आजची तरुणाईदेखील हा फॅशन ट्रेण्ड उत्तमरित्या कॅरी करताना दिसत आहे. त्यातच मग पाहायला गेलं तर आज प्रत्येक तरुणाईच्या अंगावर टॅटू किंवा पिअर्सिंग दिसून येतात. अनेक जण आवड म्हणून तर काही जण केवळ फॅशन म्हणून या गोष्टी करतात. सध्या तरुणाईमध्ये पिअर्सिंगची मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येत आहे. मात्र पिअर्सिंग करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
पिअर्सिंग म्हणजे शरीरावरील काही भागांवर रिंग किंवा अन्य एखादा दागिना टोचून घेणे. यामध्ये अनेक जण कान,नाक, भुवयी किंवा ओठांवर टोचून घेतात. मात्र अनेक वेळा शरीरावर टोचून घेतल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

१. संसर्ग होणे – पिअर्सिंग करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासोबतच एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून हे करुन घ्यावं. कारण अनेक वेळा हलगर्जीपणामुळे पिअर्सिंग करताना रक्तात संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर संसर्ग झाल्याची शक्यता निर्माण झाल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

२. अॅलर्जी होणे –
विशिष्ट धातूंचा वापर करुन शरीरावर बॉडी पिअर्सिंग करण्यात येतं. काही जणांनांची त्वचा सेन्सेटीव्ह असते. त्यामुळे अशा व्यक्तींना या धातूपासून अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा बॉडी पिअर्सिंग केल्यानंतर सूज येणे, रॅशेस येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

३. अतिरिक्त रक्तस्राव – बॉडी पिअर्सिंग करतान कधी-कधी सुई चुकीच्या ठिकाणी टोचली जाते. परिणामी, अशा ठिकाणाहून रक्तस्राव होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पिअर्सिंग करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते.

४. एक्सपर्ट व्यक्तीकडून पिअर्सिंग करावे –
पिअर्सिंग कधीही या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा योग्य प्रशिक्षित व्यक्तीकडून करुन घ्यावं. कमी अनुभवी व्यक्तीकडून पिअर्सिंग करुन घेतलं. तर त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. चुकीच्या ठिकाणी पिअर्सिंग करुन घेतल्या या ठिकाणचा भाग मृत होण्याची शक्यता असते.