काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला अलिया भटचा एक लघुपट सोशल नेटवर्किंग साईटवर खूप पाहिला गेला. निर्जन ठिकाणी गाडी नादुरुस्त झालेल्या एका तरुणीच्या माध्यामातून स्त्रियांच्या सुरक्षेचा विषय यात प्रभाविपणे मांडण्यात आला होता. या लघुपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दिल्ली शहरातील सार्वजनिक ठिकाणी अंगावरील बाथिंग गाऊन उघडा करून भर रस्त्यात आणि मॉलसारख्या गजबजलेल्या ठिकाणी वावरणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बहुचर्चित व्हिडिओमधील तरुणीने का केलं हे धाडस? व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या!
(छाया सौजन्य – प्रॅंकबाझ व्हिडिओ)