News Flash

ब्रोकोली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टाळणे शक्य

माहिती अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठातील संशोधकांनी दिली

| March 18, 2017 01:38 am

ब्रोकोली या फळभाजीमधील काही पूरक घटकांमुळे कर्करोगाचा धोका टाळता येणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. शरीरातील ‘रिबॉन्सेलिक अ‍ॅसिड’ (आरएनए) हे रेणू विविध पेशींवर नियंत्रण ठेवत असतात. ब्रोकोली या रेणूंवरच प्रभाव पाडत असल्याने कर्करोगावर नियंत्रण शक्य असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

शरीरातील आरएनए हे रेणू नेहमीच दुर्लक्षित राहिले असल्याची माहिती अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठातील संशोधकांनी दिली. शरीरातील पेशीच्या विकासात आणि त्यांच्यावरील नियंत्रणात या रेणूंचा मोठा वाटा असतो. मात्र, या रेणूंमध्ये अनियमितता निर्माण झाल्यास त्यामुळे कर्करोगासारखे आजार बळावण्याचा धोका वाढतो.

मूर फॅमिली सेंटरच्या इमिली हो यांनी ब्रोकोलीमध्ये असलेले ‘रिबॉन्सेलिक अ‍ॅसिड’ (आरएनए)या रेणुंवर प्रभाव पाडत असल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचे म्हटले आहे. काही पदार्थ आणि व्यसने यांमुळे कर्करोगाला निमंत्रण मिळत असते. मात्र, ब्रोकोलीमुळे त्यावर नियंत्रण शक्य असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. कर्करोगाची प्रक्रिया संथ असल्यामुळे ब्रोकोलीचा विशेष प्रभाव त्यावर पडतो. कर्करोगाच्या पेशी कमी करण्यात या भाजीचा मोलाचा वाटा असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:38 am

Web Title: broccoli cancer
Next Stories
1 पेट टॉक : श्वान लठ्ठपणाची सुदृढ बाजारपेठ
2 Healthy Living : दही कधी खावे?
3 प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी बी जीवनसत्त्व उपयोगी
Just Now!
X