News Flash

‘रॉयल एनफील्ड’ची अ‍ॅडव्हेंचर बाइक Himalayan लाँच, बुकिंगलाही झाली सुरूवात

'रॉयल एनफील्ड'ची अ‍ॅडव्हेंचर बाइक Himalayan...

‘रॉयल एनफील्ड’ने आपली Himalayan ही अ‍ॅडव्हेंचर बाइक BS6 इंजिनसह लाँच केली आहे. 2020 रॉयल एनफील्ड हिमालयन अनेक नव्या फीचर्ससह आली आहे. या बाइकमध्ये BS6 इंजिन आणि नवीन ड्युअल-टोन कलरचा पर्याय आहे. कंपनीने ही बाइक सर्वप्रथम 2016 मध्ये लाँच केली होती. कंपनीकडून या बाइकवर तीन वर्षे वॉरंटी दिली जाणार असून 20 जानेवारीपासून या बाइकच्या बुकिंगलाही सुरुवात झालीये.

या ऑफ-रोड बाइकमध्ये स्विचेबल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) फीचर कंपनीने दिलंय. याचे वैशिष्ट्य म्हणजे मागच्या चाकांचे एबीएस कंट्रोल डिसकनेक्ट देखील करता येते. रॉयल एनफील्डची नवीन हिमालयन बाइक स्लीट ग्रे, ग्रेवल ग्रे, ग्रेनाइट ब्लॅक आणि स्नो व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय लेक ब्लू आणि रॉक रेड या दोन नव्या रंगाचा पर्यायही आहे. दिल्लीमध्ये ग्रेनाइट ब्लॅक आणि स्नो व्हाइट कलर असलेल्या हिमालयनची एक्स-शोरूम किंमत एक लाख 86 हजार 811 रुपये, तर स्लीट ग्रे आणि ग्रेवेल ग्रे कलरच्या हिमालयन बाइकची किंमत एक लाख 89 हजार 565 रुपये आहे. याशिवाय , रॉक रेड आणि लेक ब्लू कलरची एक्स-शोरूम किंमत एक लाख 91 हजार 401 रुपये आहे.

3 वर्षे वॉरंटी :
रॉयल एनफील्डच्या नव्या हिमालयन बाइकवर कंपनीकडून तीन वर्षांची वॉरंटी आहे. या बाइकमध्ये BS6 मानकांसह 411cc सिंगल सिलिंडर, 4 स्ट्रोक, एअर-कुल्ड इंजिन असून हे इंजिन 24.3bhp ऊर्जा आणि 32Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही बाइक म्हणजे Classic 350 ड्युअल-चॅनल ABS नंतर BS6 मानकांसह आलेली रॉयल एनफील्डची दुसरी बाइक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:33 am

Web Title: bs vi royal enfield himalayan launched at rs 1 87 lakh know new features dual tone colour options sas 89
Next Stories
1 आली Maruti ची नवीन Celerio, किंमत 4.41 लाख रुपये
2 लसिका रक्तपेशी कमी झाल्यास होऊ शकतो मृत्यू
3 ऑटिझम विकारातील मुलं राहातात निदानापासून वंचित
Just Now!
X