पियाज्जो इंडियाने Aprilia आणि Vespa या दोन स्कुटर बीएस6 उत्सर्जन मानकांसह लाँच केल्या आहेत. दोन्ही स्कुटरमध्ये अधिक दमदार 160 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन असून Aprilia SR 150 चं नाव बदलून आता Aprilia SR 160 असं करण्यात आलं आहे. नव्या इंजिनव्यतिरिक्त दोन्ही स्कुटीच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन 160 सीसी इंजिन क्षमतेच्या व्हेस्पा आणि एप्रिलिया या दोन्ही स्कुटर देशभरातील डीलर्सकडे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कंपनी जानेवारीपर्यंत 125 सीसी स्कुटीचं अपग्रेडेड मॉडलदेखील लाँच करणार आहे.

इंजिन –
एप्रिलिया आणि वेस्पा स्कुटर्सच्या बीएस4 मॉडलमध्ये 154.8cc सिंगल-सिलिंडर इंजिन होतं, पण आता बीएस6 व्हर्जनमध्ये 160cc क्षमतेचं इंजिन आहे. जुन्या मॉडलमधील इंजिन क्षमता 10.4 bhp होती, तर नव्या इंजिनची क्षमता 10.8 bhp आहे.

आणखी वाचा – ‘सुझुकी’ने आणली नवी Access, खासियत काय?

किंमत –
बीएस6 इंजन असलेल्या नवीन एप्रिलिया एसआर 160 स्कुटीची एक्स-शोरुम किंमत 85 हजार 431 रुपये आहे. ही किंमत जुन्या मॉडलपेक्षा जवळपास 10 हजार रुपयांनी जास्त आहे. तर नवीन BS6 Vespa 150 SXLची किंमत आता 91 हजार 492 रुपये आहे.