‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या मालकीच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने भारतात BS6 कंप्लायंट इंजिनसह ‘जावा’ आणि ‘जावा 42’ या दोन बाइक लाँच केल्यात. जावा आणि जावा फोर्टी टू या दोन बाइक नोव्हेंबर 2018 मध्ये भारतात लाँच केल्या होत्या. यापूर्वी कंपनीने नोव्हेंबर 2019 मध्ये  आपली बॉबर स्टाइल बाइक ‘जावा पेराक’ बीएस-6 इंजिनमध्ये आणली आहे.

(आणखी वाचा -लाँचिंगआधीच बुकिंगला सुरूवात, ‘सेल्टॉस’ला Hyundai च्या ‘एसयूव्ही’ची टक्कर)

BS6 इंजिन असलेली जावा (Jawa) बाइक ब्लॅक, ग्रे आणि मरून अशा तीन रंगांच्या पर्यायामध्ये आली आहे. ही बाइक सिंगल चॅनल आणि ड्युअल-चॅनल ABS अशा दोन पर्यायांमध्ये आली आहे. BS6 अपडेटेड जावा आणि जावा 42 बाइकच्या किंमतीत 5 हजार रुपयांपासून 9 हजार 928 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. BS6 इंजिनच्या Jawa सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.73 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, BS4 इंजिन असलेल्या Jawa सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंट्सची किंमत 1.64 लाख रुपये आहे.

(आणखी वाचा -आली ‘हीरो’ची Super बाइक, आधीपेक्षा जास्त पावरफुल-ग्राउंड क्लिअरंसही वाढला)

दुसरीकडे, BS6 इंजिनसह आलेल्या Jawa ड्युअल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.82 लाख ते 1.83 लाख रुपयांदरम्यान आहे. तर, BS4 इंजिनसोबत आलेल्या Jawa ड्युअल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.73 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत. BS6 इंजिनची जावा 42 ही बाइक सहा कलर्सच्या पर्यायांमध्ये येईल. या बाइकच्या सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.60 लाख रुपये ते 1.65 लाख रुपयांदरम्यान आहे. तर, BS4 इंजिन Jawa 42 बाइकच्या सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.55 लाख रुपये आहे.

(आणखी वाचा – Pulsar ला टक्कर, Hero ने आणली ‘झकास’ बाइक )

Jawa 42 बाइकच्या ड्युअल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.69 लाख ते 1.74 लाख रुपयांदरम्यान आहे. तर, BS4 इंजिनसोबत आलेल्या Jawa 42 च्या ड्युअल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.64 लाख रुपये आहे. 2020 Jawa आणि Jawa 42 दोन्ही बाइकमध्ये BS6 कंप्लायंट 293cc, सिंगल-सिलिंडर, फोर स्ट्रोक, लिक्विड-कुल्ड इंजिन असून यात फ्युअल इंजेक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बाइकमध्ये क्रॉस पोर्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून, याचा वापर करणारी ही भारतातील पहिलीच बाइक असल्याचं सांगितलं जात आहे.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

BS4 व्हेरिअंटप्रमाणे Jawa आणि Jawa 42 बाइकचे BS6 इंजिन 27bhp पीक पावर आणि 28Nm पीक टॉर्क निर्माण करते. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स असून सस्पेंशनसाठी पुढील बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागे ड्युअल शॉक्स आहे. बेसिक व्हेरिअंटमध्ये रिअर ड्रम ब्रेक आहे.

(आणखी वाचा – पुण्यातून झालीये विक्रीला सुरूवात, पण बजाजची Chetak धावेचना…)

 ( आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच)