News Flash

‘कावासाकी’ची नवीन Ninja लाँच, होंडाच्या CBR650F ला टक्कर

बाइकमध्ये अपराइट रायडिंग पोझिशन, लो सीट हाइट, स्टँडर्ड एबीएस आणि ईजी पावर डिलिव्हरी यांसारखी वैशिष्ट्ये

कावासाकी इंडियाने आपली Kawasaki Ninja 650 ही प्रीमियम बाइक BS6 व्हर्जनमध्ये भारतात लाँच केली आहे. BS6 अपडेटमुळे बाइकच्या किंमतीत वाढ झालीये. पण मागील काही लाँचिंगप्रमाणेच कंपनीने यावेळीही बाइकच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र, कावासाकी निंजा 650 ची किंमत 6.45 लाख ते 6.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते अशी घोषणा केलीये.

इंजिन आणि फीचर्स –
2019 Kawasaki Ninja 650 बाइकमध्ये 649सीसी, पॅरेलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 67 बीएचपी ऊर्जा आणि 65.7 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स असून स्टँडर्ड स्लिपर क्लच देखील आहे. बाइकमध्ये अपराइट रायडिंग पोझिशन, लो सीट हाइट, स्टँडर्ड एबीएस आणि ईजी पावर डिलिव्हरी यांसारखी वैशिष्ट्ये असल्याने ही बाइक सर्वोत्तम ‘बिगिनर्स स्पोर्ट टुअरिंग’ मोटरसायकल ठरते असे कंपनीने म्हटले आहे. Ninja 650 आपल्या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी फुल फेअर्ड मिडलवेट मोटरसायकल्सपैकी एक आहे. भारतीय रस्त्यांवर होंडाच्या CBR650F बाइकशी नव्या निंजाची थेट टक्कर असेल. Kawasaki Ninja 650 मध्ये 41mm टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स आणि बॅक लिंक मोनोशॉक अॅजस्टबल प्रीलोड मागच्या चाकाला आहे. बाइकमध्ये ब्रेकिंगसाठी ड्युअल फ्रंट आणि सिंगल रिअर पेटल डिस्क ब्रेक्स आहेत. यात स्टँडर्ड फीचर म्हणून एबीएस म्हणजे अँटी ब्रेकिंग सिस्टिम फीचर आहे.

आणखी वाचा – आली TVS ची नवीन Apache, जाणून घ्या किंमत आणि खासियत?

किमान 56,000 रुपये वाढणार किंमत –
BS6 निंजा 650 ची किंमत 6.45 लाख ते 6.75 लाख रुपये असू शकते हे कंपनीने स्पष्ट केलंय. त्यामुळे ही बाइक BS4 व्हर्जनपेक्षा जवळपास 56 हजार रुपये महाग असू शकते. कंपनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये बाइकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले होते. 2019 मॉडेलमध्ये कोणताही कॉस्मेटिक किंवा तांत्रिक बदल केला नव्हता. 2017 मध्ये कावासाकी निंजा 650 बाइक अपडेट केली होती त्यावेळी बाइकच्या वजनात आणि स्टाइलमध्ये बदल करण्यात आला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 11:43 am

Web Title: bs6 kawasaki ninja 650 launched in india to be priced between rs 6 45 6 75 lakh know all details sas 89
Next Stories
1 चार कॅमेऱ्यांच्या Oppo F15 चा आजपासून सेल, जाणून घ्या ऑफर्स
2 शरीरातील लिंफोसाइट कमी झाल्यास तुमचा मृत्यू अटळ
3 Sony Walkman चं पुनरागमन, वाय-फाय आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्टही
Just Now!
X