सुझुकी मोटरसायकल्सने भारतातील आपल्या दोन बाइकच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने Suzuki Gixxer आणि Gixxer SF बाइक्सच्या किंमतीत वाढ केली आहे.

किंमतीत वाढ झाल्यानंतर आता जिक्सर आणि जिक्सर एसएफ बाइक्स 160cc सेगमेंटमध्ये अन्य स्पर्धक कंपन्यांच्या बाइकपेक्षा जास्त महाग झाल्या आहेत. या सेगमेंटमध्ये बजाज पल्सर NS160, TVS अपाचे RTR 160 4V, नवीन हीरो एक्स्ट्रीम 160R आणि बीएस6 होंडा X-Blade या बाइक्सचा समावेश होतो.

इंजिन :-
सुझुकीच्या या दोन्ही बाइकमध्ये 155cc सिंगल-सिलिंडर, एअरकूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 13.4 bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 13.8 Nm टॉर्क निर्माण करतं. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 व्हर्जनमध्ये इंजिन आउटपूट थोडं कमी झालं आहे. बीएस-4 व्हर्जनमध्ये हे इंजिन 14 bhp ची पॉवर आणि 14 Nm टॉर्क जनरेट करायचं. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

किंमत :-
कंपनीने मार्च महिन्यात या दोन्ही बाइक नवीन बीएस6 मॉडेलमध्ये लाँच केल्या होत्या. आता दोन्ही बाइकच्या किंमतीत कंपनीने 2,070 रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत वाढ झाल्याने आता BS6 Gixxer साठी तुम्हाला 1,13,941 रुपये, तर BS6 Gixxer SF साठी 1, 23,940 रुपये मोजावे लागतील. लाँचिंगवेळी जिक्सरची किंमत 1,11,871 रुपये आणि जिक्सर एसएफची किंमत 1,21,871 रुपये होती. याशिवाय कंपनीच्या Gixxer SF MotoGP व्हेरिअंटची किंमत  1, 24,970 रुपये आहे. यापूर्वी कंपनीने अॅक्सेस 125 आणि बर्गमैन स्ट्रीट स्कूटर्सच्या किंमतीतही अनुक्रमे 1,700 रुपये आणि 1,800 रुपयांची वाढ केली होती.