News Flash

‘टीव्हीएस’ची नवीन NTorq 125, किंमत किती?

स्कुटरचे ड्रम, डिस्क आणि रेस असे तीन व्हेरिअंट

(छाया सौजन्य : bikedekho.com)

TVS NTorq 125 स्कुटर बीएस-6 इंजिनसह लवकरच बाजारात येणार आहे. BS6 TVS NTorq 125 ची बेसिक किंमत 65 हजार 975 रुपये इतकी असेल. टीव्हीएसने ही स्कुटर अद्याप अधिकृतपणे लाँच केली नाहीये, पण वेबसाइटवर किंमत अपडेट करण्यात आली आहे. बीएस-4 व्हर्जनप्रमाणे बीएस-6 व्हर्जनही ड्रम, डिस्क आणि रेस अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 एनटॉर्क स्कुटरची किंमत 10 हजार रुपये अधिक असेल. बीएस-6 व्हर्जनमध्ये अपडेटेड इंजिनशिवाय स्टाइलिंग आणि फीचरमध्ये काही बदल केलाय की नाही याची माहिती स्कुटरच्या लाँचिंगवेळी दिली जाणार आहे. बीएस6 एनटॉर्क 125 स्कुटरमध्ये नवीन फीचर्स आणि डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, बीएस6 व्हर्जनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली जाण्याची शक्यता आहे. एनटॉर्क 125 टीव्हीएसच्या लोकप्रिय स्कुटरपैकी एक आहे. लॉन्चिंगच्या सात महिन्यांहून कमी कालावधीत या स्कुटरच्या एक लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. आधीप्रमाणे बीएस-6 एनटॉर्क स्कुटरची मार्केटमध्ये होंडा ऐक्टिवा 125 आणि सुझुकी अॅक्सेस 125 यांसारख्या स्कुटरशी स्पर्धा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 9:22 am

Web Title: bs6 tvs ntorq 125 price revealed on website know all details sas 89
Next Stories
1 बजाजच्या Pulsar मध्ये नवीन इंजिन, मायलेज वाढला; किंमतीतही बदल
2 तब्बल 12 हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S10, काय आहे नवी किंमत?
3 जाणून घ्या, केळींच्या सालीचे गुणधर्म आणि फायदे
Just Now!
X