28 September 2020

News Flash

Yamaha ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक R15 , बीएस-6 इंजिनसह झाली लाँच

यापूर्वी यामाहाने BS6 इंजिनसह FZ आणि FZS या दोन बाइक्स भारतात लाँच केल्या आहेत.

(छायाचित्र सौजन्य -Bikedekho.com)

दुचाकी निर्माती अग्रगण्य कंपनी ‘यामाहा’ने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा R15 V3 (Yamaha R15) नव्या BS-6 इंजिनसह लाँच केली आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी भारतात एप्रिल 2020 पासून लागू होत असलेल्या बीएस-6 मानकांसह वाहनं अपग्रेड करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी यामाहाने BS6 इंजिनसह FZ आणि FZS या दोन बाइक्स भारतात लाँच केल्या आहेत. R15 V3 च्या BS6 व्हर्जनची किंमत 1.46 लाख रुपये(एक्स-शोरुम) आहे. यापूर्वीच्या BS4 व्हेरिअंटपेक्षा नव्या बाइकची किंमत चार हजार रुपयांनी अधिक आहे.

यामाहा R15 फीचर्स –
या बाइकमध्ये 155cc, SOHC, 4-व्हॉल्व, लिक्विड-कूल्ड, फ्युअल इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 10,000rpm वर 19.3hp ची ऊर्जा आणि 8,500rpm वर 15Nm टॉर्क निर्माण करतं. यामध्ये 6-स्पीड ट्रांसमिशनचा पर्याय असून या स्पोर्ट्स बाइकमध्ये स्लिपर क्लच, गिअरशिफ्ट लाइटसह डिजिटल मल्टी-फंक्शनल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट आणि एलईडी टेललाइट यांसारखे फीचर्स आहेत. यामाहा 21 जानेवारी रोजी एक नवीन दुचाकी देखील लाँच करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 1:15 pm

Web Title: bs6 yamaha r15 v3 0 launched at rs 1 45 lakh sas 89
Next Stories
1 घोरण्यामुळे त्रस्त आहात?; तर मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल
2 उंची वाढत नाहीये? करा हे उपाय; नक्कीच होईल फायदा
3 Redmi Note 8 आणि Redmi 8 चा आज ‘फ्लॅशसेल’, दुपारी 12 वाजेपासून सुरूवात
Just Now!
X