Reliance Jio, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच टॅरिफ दरवाढीनंतर आपले नवे प्रीपेड प्लॅन्स लागू केले, नव्या प्लॅन्सद्वारे या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असताना सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL मात्र आपल्या जुन्या प्लॅन्सद्वारेच या खासगी कंपन्यांना टक्कर देत आहे. टॅरिफ दरवाढीनंतर खासगी कंपन्यांनी आपल्या सेवा मर्यादित केल्या, पण बीएसएनएलकडे अजुनही ‘अनलिमिटेड बेनिफिट’ असलेले प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्सची सुरूवात 108 रुपयांपासून होते. तर, बीएसएनएनलच्या 1699 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत वैध आहे.

365 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभरासाठी एकूण 1095जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट आणि होम नेटवर्कलवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसंच, दररोज 100 फ्री एसएमएस देखील आहेत. म्हणजेच दररोज 3GB डेटा युजर्सना मिळेल. सुरूवातीला या प्लॅनमध्ये दररोज 2जीबी डेटा दिला जात होता, पण आता नव्या ऑफरसह कंपनी यामध्ये 1जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. तर, 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत याच प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3.5जीबी डेटा ऑफर मिळत होता.

आणखी वाचा- मोबाइल नंबर पोर्ट करायचाय? जाणून घ्या ‘ट्राय’चा नवा नियम

1,999 रुपयांचा प्लॅन –
बीएसएनएलने चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलसाठी 1,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन सुरू केला असून 365 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 3जीबी डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस आणि अन्य नेटवर्कसाठी 250 मिनिट कॉलिंग आहे. याशिवाय हा प्लॅन घेणाऱ्यांना एक वर्षासाठी SonyLIV चं मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.