04 March 2021

News Flash

बीएसएनएलचा 399 रुपयांचा प्लॅन, दररोज मिळवा 3.21 जीबी डेटा

या प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सेवाही मिळेल

खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने एक नवा शानदार रिचार्ज प्लॅन आणला आहे. 399 रुपयांचा हा जुनाच रिचार्ज प्लॅन आहे पण यामध्ये कंपनीने काही बदल केलेत. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3.21GB डेटा मिळेल. तसंच 74 दिवसांची वैधता या प्लॅनची असेल.

यापूर्वी 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळत होता. पण आता दररोज 3.21 जीबी डेटा वापरता येईल. म्हणजेच एकूण 237.54 जीबी डेटा ग्राहकांना मिळेल, आधी केवळ 74 जीबी डेटा वापरण्यास मिळत होता. या प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सेवाही मिळेल. तसंच ग्राहक दररोज 100 एसएमएस मोफत पाठवू शकतात. काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलने 365 दिवस वैधता असलेला 1,312 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. वर्षभरासाठी वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 1:22 pm

Web Title: bsnl 399 rupee recharge plan daily 3 21gb data for 74 days
Next Stories
1 ‘स्कोडा’ची नवी कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 JioPhone 2 खरेदी करण्याची अजून एक संधी
3 Amazon वर सारेगम कारवाँ जिंकण्याची संधी; अशी खेळा क्विझ
Just Now!
X