Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दोन शानदार प्लॅन आणले आहेत. यातील पहिला प्लॅन 96 रुपये आणि दुसरा प्लॅन 236 रुपयांचा आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना दररोज 10 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

पाहा फोटो –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)

कंपनीचे हे दोन नवे प्लॅन्स केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कोलकाता, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम 3G सीमकार्डला 4G सीमकार्डमध्ये बदलून घ्यावं लागेल. 96 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 10 जीबी 4G डेटाही मिळेल. म्हणजे एकून 280 जीबी इंटरनेट डेटा ग्राहकांना वापरायला मिळेल. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा SMS चा अतिरिक्त फायदा मिळणार नाही.

आणखी वाचा – Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक

तर, 236 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय प्रतिदिन 10 जीबी 4G डेटाही ग्राहकांना वापरता येईल, म्हणजे ग्राहकांना एकूण 840 जीबी डेटा उपलब्ध असेल. या प्लॅनमध्येही कॉलिंग किंवा SMS चा अतिरिक्त फायदा मिळणार नाही.