01 December 2020

News Flash

BSNL ची खास ऑफर आता 31 ऑगस्टपर्यंत, कॉलच्या बदल्यात 50 रुपये कॅशबॅक!

BSNL ची खास ऑफर...

BSNL च्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनीने आपली ‘5 pe 6’ ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  आधी ही ऑफर कंपनीने 31 जुलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. या ऑफरमुळे ग्राहकांना दर महिन्याला 50 रुपयांचा फायदा होऊ शकतो.

ही खास ऑफर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केली होती. जे युजर्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलतात त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. लोकांचा लँडलाइन कॉलिंगकडे कल वाढावा यासाठी कंपनीने ही कॅशबॅक ऑफर आणली होती. ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या आययूसी चार्जच्या घोषणेनंतर कंपनीने या ऑफरची घोषणा केली होती. त्यावेळी जिओने अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. या ऑफरनुसार युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. यामध्ये एका ग्राहकाला दर महिन्याला जास्तीतजास्त 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. बीएसएनएलचे ग्राहक व्हॉइस कॉलद्वारे किंवा एसएमएस पाठवून 6 पैसे कॅशबॅक मिळवू शकतात. ही ऑफर बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) सब्सक्राइबर्ससाठी आहे.

बीएसएनएलची ही कॅशबॅक ऑफर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना 9478053334 नंबरवर ‘ACT 6 paisa’ टाइप करुन एसएमएस करावा लागतो. याशिवाय 18005991900 या टोल-फ्री क्रमांकावरव कॉल करुनही ही ऑफर अ‍ॅक्टिव्ह करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 1:38 pm

Web Title: bsnl again extends six paisa cashback offer for broadband and ftth customers till august 31 get details sas 89
Next Stories
1 48 MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची बॅटरी, Infinix Hot 9 Pro खरेदी करण्याची संधी
2 आता ‘पॉवरफुल’ रॅमसह खरेदी करा Redmi Note 9 Pro Max, किंमत किती?
3 Tata Sky ची ‘डबल धमाका’ ऑफर, ‘या’ सहा सेवांच्या किंमतीत झाली 50% कपात
Just Now!
X