सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन भारत फायबर प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस स्पीडने तब्बल 2 टीबी (2,000 जीबी डेटा) मिळेल. यासोबतच कंपनीकडून युजर्सना 999 रुपये किंमतीचे amazon prime चे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

बीएसएनएलच्या युजर्सना या प्लॅनमध्ये दर महिन्याला100 एमबीपीएसच्या स्पीडने 2 टीबी म्हणजे 2000 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवाही मिळेल. सध्या हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलमध्येच उपलब्ध आहे. पण देशातील अन्य क्षेत्रांमध्येही हा प्लॅन लवकरच उपलब्ध केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीएसएनएलचे देशभरात सात भारत फायबर प्लॅन सुरू आहेत. तसेच खास सर्कलसाठी सुद्धा हे प्लॅन आहेत. १ हजार ९९९ रुपये आणि २ हजार ९९९ रुपयांचा प्लॅन कंपनी देत आहे. या सर्व प्लॅनसाठी एफयूपीची मर्यादा नाही.

आणखी वाचा – ‘व्होडाफोन-आयडिया’च्या युजर्ससाठी आता Vodafone Red, जुने प्लॅन्स बंद

BSNL ₹2,999 प्लॅन Vs जिओ ₹2,499 प्लॅन :
जिओच्या 2,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 1500GB डेटा 500Mbps स्पीडसह मिळतो. सहा महिन्यांनंतर डेटा बेनिफिट 1250 जीबी डेटा मिळेल. या तुलनेत BSNL च्या 2 हजार 999 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला 100 एमबीपीएसचा वेग मिळणार असून 2 टीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये कोणतेही एफयूपी मर्यादा नाही.