News Flash

गणेशोत्सवानिमित्त BSNLची धमाकेदार ऑफर; रोज २.२ जीबी अधिक डेटा

नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणांमध्येही ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर देण्यात येतील असे कंपनीचे म्हणणे आहे.

संग्रहित छायाचित्र

सणवार आले किंवा आणखी काही विशेष असेल की कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देऊन आकर्षित करतात. BSNL ने नुकताच आपला एक खास प्लॅन जाहीर केला असून सणाच्या काळात ग्राहकांना खुश करण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच मागच्या काही काळापासून कंपन्या आपले नवनवीन प्लॅन्स बाजारात दाखल करत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कंपनीने अशीच एक खास प्रीपेड ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना आपल्या नेहमीच्या मर्यादेपेक्षा रोज २.२ जीबी डेटा जास्त मिळणार आहे. ही ऑफर १८६, ४२९, ४८५, ६६६ आणि ९९९ रुपयांच्या प्लॅनवर लागू करण्यात आली आहे. देशभरात लागू करण्यात आलेली ही ऑफर दिल्ली आणि मुंबई येथे मात्र लागू नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ही ऑफर ६० दिवसांसाठी लागू करण्यात आल्याने ग्राहकांना यामध्ये एकूण १३२ जीबी डेटा मिळणार आहे. वर दिलेल्या किमतीचे प्लॅन आधीपासून वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना १८७, ३३३, ३४९, ४४८ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. सणावारांच्या काळात ग्राहकांचा इंटरनेटचा वापर वाढतो. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा फोटो आणि व्हिडियो पाठविण्यासाठी जास्त इंटरनेटची आवश्यकता असल्य़ाने कंपनीने ही ऑफर दिली आहे. याआधी कंपनीने मान्सून ऑफर दिली होती. जास्तीत जास्त ग्राहकांना त्याचा फायदा घेता यावा यासाठी कंपनीने ही ऑफर १५ सप्टेंबरपर्यंत वाढविल्याचेही सांगितले होते. जूनमध्ये बाजारात आलेल्या या प्लॅनमध्ये रोज २ जीबी जास्तीचा डेटा देण्यात येतो. यापुढे नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणांमध्येही ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर देण्यात येतील असे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:07 pm

Web Title: bsnl bumper offer for festive season know how you will get 132 gb extra data
Next Stories
1 चॅटिंग होणार आणखी सोपं, व्हॉट्स अॅपचे दोन नवे फिचर
2 अ‍ॅस्पिरीनचा हृदयविकार, पक्षाधात रोखण्यात फायदा नाही
3 आजपासून Apple iOS 12 जारी होणार, या आयफोनमध्ये असे करा अपडेट
Just Now!
X