सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. 199 रुपये इतकी या नव्या प्रीपेड प्लॅनची किंमत आहे. यासोबतच कंपनीने PV 186 हा प्लॅन हटवण्याची घोषणाही केली आहे. एक जानेवारीपासून PV 186 हा प्लॅन उपलब्ध नसेल असं कंपनीने जाहीर केलं आहे.याशिवाय बीएसएनएलने आपल्या 998 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारी डेटा मर्यादाही 1जीबीने वाढवली आहे.

BSNL199 रुपये प्लॅन :-
BSNL च्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना हायस्पीड डेटासह कॉलिंगची सुविधाही मिळते. या नव्या प्रीपेड प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी दररोज 250 मिनिटे मिळतील. तसेच दररोज १०० एसएमएस देखील वापरण्यास मिळतील. मात्र, या अ‍ॅपमध्ये ओटीटी अ‍ॅपचं सबस्क्रिप्शन मिळणार नाही. 24 डिसेंबरपासून हा नवीन प्लॅन देशातील सर्व सर्कलमध्ये उपलब्ध होईल.

998 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटा :-
199 रुपयांच्या प्लॅनसोबतच कंपनीने 998 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारी डेटा मर्यादाही 1जीबीने वाढवली आहे. आता या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3जीबी डेटा मिळेल. आधी या प्लॅनमध्ये केवळ 2जीबी डेटा मिळायचा. अतिरिक्त डेटा 24 डिसेबरपासून मिळण्यास सुरूवात होईल.