02 March 2021

News Flash

BSNL देणार २५८ रुपयांत १५३ जीबी डेटा

२५८ रुपयांमध्ये १५३ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ५१ दिवसांची असून यामध्ये रोज ३ जीबी डेटा वापरण्याला परवानगी आहे.

टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे. बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये २५८ रुपयांमध्ये १५३ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ५१ दिवसांची असून यामध्ये रोज ३ जीबी डेटा वापरण्याला परवानगी आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या मुहूर्तावर ही ऑफर जाहीर करण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ही ऑफर सध्या बाजारात असलेल्या जिओच्या ऑफरला टक्कर देईल अशी चर्चा आहे.

या ऑफरचे विशेष म्हणजे बीएसएनएलतर्फे ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरात आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. यापूर्वी रिलायन्स जिओने क्रिकेट सीझनसाठी २५१ रुपयांमध्ये १०२ जीबी डेटा पॅक देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर भारती एअरटेलनेही आपल्याकडे आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग निःशुल्क उपलब्ध होईल असे सांगितले होते. याबरोबरच टीव्हीवर हॉटस्टारच्या माध्यमातूनही मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. आयपीएलचा माहोल लक्षात घेऊन जिओने नव्या लाईव्ह मोबाईल गेम व क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली आहे. यामध्ये जिंकणाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. कंपनीचा क्रिकेट कॉमेडी शो जिओ धन धना धन लाईव्ह मायजिओ अॅपवर दाखवण्यात येईल. हा शो जिओ आणि अन्य ग्राहकांसाठी मोफत असेल. याची सुरूवात ७ एप्रिल संध्याकाळी ७:३० वाजता झाली असून शोचे होस्टींग सुनील ग्रोवर आणि समीर कोचर करत आहेत.

बीएसएनएलने नुकतीच आपल्या ग्रांहकांसाठी लूट लो पोस्टपेड ऑफर लाँच केली होती. या नव्या ऑफरअंतर्गत पोस्टपेडचा प्रिमियम प्लॅन असणाऱ्यांना ६० टक्के डिस्काऊंट दिला जाणार होता. विशेष म्हणजे यामध्ये एक सिम कार्डही मोफत मिळणार होते. तसेच हे कार्ड अॅक्टीव्हेट करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नसल्याचेही कंपनीकडून सागंण्यात आले होते. ही ऑफर बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना मिळेल असे यावेळी सांगण्यात आले होते. यामध्ये मिळणारे आकर्षक डिस्काऊंट पाहून अनेक जण बीएसएनएलकडे वळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे आताच्याही इंटरनेटच्या आकर्षक ऑफरमुळे बीएसएनएलकडे वळणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:18 pm

Web Title: bsnl new plan 258 rs offers 153 gb data special for ipl
Next Stories
1 असे बनवा तुमचे २०१८-१९ चे आर्थिक कॅलेंडर
2 नव्या रक्तचाचणीमुळे स्मृतिभ्रंशाचे निदान लवकर
3 नव्या रक्तचाचणीमुळे दोन वर्षांआधीच क्षय रोगाचे निदान
Just Now!
X