भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलकडे आपल्या युजर्ससाठी परवडणाऱ्या किंमतीतील अनेक प्लॅन्स आहेत. बीएसएनएलकडे एक असा प्रीपेड प्लॅनही आहे, ज्यात 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीत युजर्सना दररोज 3GB डेटा वापरण्यास मिळतो. बीएसएनएलशिवाय रिलायन्स जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन-आयडियाकडेही दररोज 3जीबी डेटा देणारे प्लॅन आहेत, पण त्यांची किमान किंमत 300 रुपयांपेक्षा जास्त आहे.

बीएसएनएलचा 247 रुपयांचा प्लॅन :-
बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटासोबत 100SMS मिळतात. डेटामर्यादा संपल्यानंतर 80Kbps या कमी इंटरनेट स्पीडने डेटा वापरता येतो. तसेच, युजर्सना अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी दररोज 250 एफयूपी मिनिटेही दिली जातात. या प्रीपेड प्लॅनमध्ये सामान्यपणे युजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. पण, सध्या कंपनीच्या वेबसाइटवर एक प्रमोशनल ऑफर सुरू आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी या प्लॅनसाठी 30 दिवसांऐवजी 40 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. कंपनीची ही ऑफर 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच वैध आहे.

दुसरीकडे, रिलायन्स जिओकडे 349 रुपयांपासून दररोज 3 जीबी डेटा देणारे प्लॅन्स सुरू होतात. तर, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे 398 रुपयांपासून दररोज 3 जीबी डेटा प्लॅनची सुरूवात होते.