सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 398 रुपयांचा नवीन डेटा व्हाउचर प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल. याशिवाय कंपनीने आपल्या अन्य दोन प्लॅन्सची वैधताही वाढवली आहे. आता कंपनीच्या 2,399 आणि 1,999 रुपयांच्या प्लॅनची वैधता वाढवली आहे.

1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 21 दिवस अतिरिक्त व्हॅलिडिटी :-
BSNL च्या 1,999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आता 21 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळणार आहे. आतापर्यंत या प्लॅनमध्ये एक वर्ष म्हणजे ३६५ दिवसांची वैधता मिळायची, पण आता 386 दिवसांची वैधता असेल. 31 जानेवारी 2021 पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (दररोज 250 मिनिटे) आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, रोमिंगही पूर्णतः फ्री असेल. याशिवाय 365 दिवसांसाठी Eros Now चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 72 दिवसांची अतिरिक्त वैधता :-
BSNL ने आपल्या 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केला असून आता यामध्ये 72 दिवस अतिरिक्त वैधता मिळते. आतापर्यंत या प्लॅनमध्ये 365 दिवस वैधता मिळायची पण आता 437 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा FUP लिमिट शिवाय, 100 एसएमएस आणि Eros Now चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. 31 मार्च 2021 पर्यंत ही ऑफर वैध असेल. मात्र यामध्ये डेटा बेनिफिट मिळणार नाही.

398 रुपयांचा प्लॅन :-
कंपनीच्या 398 रुपयांच्या नवीन STV प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस वापरण्यास मिळतील. या प्लॅची व्हॅलिडिटी 30 दिवस आहे.