सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा एक नवीन प्रिपेड प्लॅन आणला आहे. कंपनीने 197 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे.

197 रुपयांचा प्लॅन लाँच केला असला तरी कंपनीने आपला 60 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 365 रुपयांचा प्रीपेड प्लॅन महाग केलाय. आता या प्लॅनसाठी युजर्सना 397 रुपये मोजावे लागतील. आधीपेक्षा 32 रुपयांनी हा प्लॅन महाग झाला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. याशिवाय कंपनीने आपले 49 रुपये, 109 रुपये, 998 रुपये आणि 1098 रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स बंद केले आहेत. सविस्तर जाणून घेऊया 197 रुपयांच्या नवीन प्लॅनची वैधता किती आणि काय होणार फायदा :-

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन :-
197 रुपयांच्या नवीन प्रिपेड प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2जीबी डेटा वापरण्यास मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर 80 kbps इतक्या कमी स्पीडने डेटा वापरता येतो. डेटाशिवाय बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना Zing Music अ‍ॅपचं मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल. या प्लॅनची वैधता 180 दिवस आहे, पण प्लॅनसोबत मिळणाऱ्या इतर बेनिफिट्सची वैधता केवळ 18 दिवस आहे.